पाणावलेल्या डोळ्यांनीच कडक सॅल्यूट; रोहित शर्मानं निवृत्तीची घोषणा करताच पत्नीच्या भावनांचा बांध फुटला

[ad_1]

Ritika Sajdeh reacts on Rohit Sharma Retirement : भारतीय क्रिकेट संघात मागील कैक वर्षांपासून भरीव योगदान देणाऱ्या आणि संघातील नव्या पिढीच्या खेळांडूंसोबतच वरिष्ठ खेळाडूंनाही सोबत घेऊन संघ एकसंध ठेवण्याचं उत्तम काम करणाऱ्या रोहित शर्मानं नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वयाच्या 38 व्या वर्षी रोहितनं ‘जेंटलमन्स क्रिकेट’ अशी ओळख असणाऱ्या कसोटी क्रिकेटमधून काढता पाय घेतला. 

इंग्लंड दौऱ्याआधीच त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्थात एक Instar Story शेअर करत आपल्या या निर्णयाची सर्वांनाच कल्पना दिली. मागील कैक दिवसांपासून सुरू असणाऱ्या चर्चांनुसार इंग्लंड दौऱ्यादरम्यान रोहितऐवजी शुभमन गिलवर संघाच्या नेतृकत्त्वाची धुरा निवड समितीकडून सोपवली जाणार असल्याचं म्हटलं गेलं. याच चर्चांदरम्यान रोहितनं निवृत्तीची घोषणा केल्यानं सारंकाही आलबेल नसल्याचच स्पष्टही झालं. 

इथं साऱ्या देशाचं लक्ष भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) या लष्करी कारवाईकडे लागलेलं असतानाच रोहितची ही पोस्ट समोर आली आणि क्रिकेटप्रेमींना धक्काच बसला. ‘हेलो… मली सर्वांना हेच सांगायचंय की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. शुभ्र पोषाखात (कसोटी क्रिकेटमध्ये) भारतीय संघाचं नेतृत्त्वं करणं माझ्यासाठी अतिशय सन्मानाची बाब ठरली. मागील कैक वर्षांपासून तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्वं करत राहीन’, अशा चार भावनिक ओळी लिहित त्यानं कसोटी क्रिकेटच्याच टोपीसोबतचा फोटो स्टोरीमध्ये शेअर केला होता. 

रोहितच्या निर्णयानं पत्नी भावूक 

रोहितनं ही पोस्ट करताच क्षणार्थातच ती वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली आणि चाहत्यांनी त्यानं हा निर्णय का घेतला, असाच प्रश्न उपस्थित केला. रोहितची पत्नी, रितिका सजदेह हिनंसुद्धा त्याच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. फार काही न बोलता, विखुरलेल्या भावना एकवटत तिनं  त्याच्या स्टोरीला रिशेअर केलं. भावनांचा बांध फुटलेल्या रितीकानं हृदयभंग, सॅल्यूट आणि अश्रूंच्या इमोजीचा वापर करत आपली प्रतिक्रिया दिली. 

Rohit Sharma Retirement wife Ritika Sajdeh shares an emotional post after criceters announcement

मैदानावर आणि मैदानाबाहेर कायमच रितिका रोहितचा आधार म्हणून उपस्थित राहिल्याचं आजवर अनेकदा पाहायला मिळालं आहे. या आव्हानात्मक निर्णयाच्या वेळीसुद्धा ती त्याच्यासोबतच असून रोहितला या परिस्थितीचा सामना करण्यात धीर देत असेल असं म्हणायला हरकत नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *