एअर स्ट्राईकपासून हाफीज सईद गायब, दहशतवाद्यांच्या दफनविधीलाही गैरहजर, मारला गेला?

[ad_1]

Hafiz Saeed: दहशतवादी हाफीज सईद मारला गेल्याची शक्यता आहे. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये हाफीजचे अतिशय जवळचे दहशतवादी कमांडर मारले गेले. त्यांच्या अंत्यविधीला हाफिज उपस्थित नव्हता. त्यामुळं मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये हाफीजचा समावेश तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जातेय.

भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांच्या खात्मानंतर त्यांचे जनाजे निघाले. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला लष्करातील अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानाचे राजकीय पक्षाचे नेते होते. पण दहशतवाद्यांचा आका हाफीज सईद कुठच दिसला नाही.

नमाज-ए-जनाजासाठी हाफीज सईद दिसला नाही. हाफिज सईद भारतीय लष्कराच्या मिसाईल्सचा निशाणा बनला नाही ना? अशी चर्चा आता सुरु झालीये. भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये लष्कर ए तोएबाचा टॉप कमांडर हाफिज रौफ मारला गेला. हाफिज सईदही मारला गेल्याची दाट शक्यता आहे. कारण हाफिज सईद अजून कुठंही दिसला नाही. शिवाय जे जनाजे निघाले होते त्यांच्यासोबत पंजाबचे इन्स्पेक्टर जनरल म्हणजे आयजीही उपस्थित होते.

हाफिज सईद मारला गेल्यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी जाहीर करण्यात आली नाही. कदाचित त्याच्या संघटनेत प्रमुख होण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता असावी त्यामुळं हाफिजच्या मृत्यूबाबत जाहीर वाच्यता केली नसल्याचं सांगण्यात येतंय. 

हाफिज सईद जर मारला गेला असेल तर ते दहशतवादविरोधी लढ्याचं मोठं यश म्हणावं लागेल. हाफिजसारखे किती जण मारले गेलेत याची माहिती काही दिवसांनी येईलच. हाफिज सईदनं काश्मीरसह भारतात अनेक दहशतवादी हल्ल्यांचे कट रचले होते. जर हाफिज मारला गेला असेल तर पुढच्या काळातल्या भारतातल्या अनेक कारवायांना पायबंद बसण्याची शक्यता आहे.

कोण आहे हाफिज सईद?

हाफिज सईद हा जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे. तो मुंबईमधील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलंय. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादामध्ये हाफिज सईदचा हात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतलीय. दहशतवादी हल्ल्यांनंतर तो मी नव्हेच असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानने मात्र दहशतवाद्याला शरण दिलीय.आणि दहशतवादी हाफिज सईदला लपवत त्याला सुरक्षा पुरवलीय. मात्र भारत या क्रूरकर्म्याला सोडणार नाही हेही तेवढंच खरंय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *