आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट; भारतातील 28 विमानतळांचा ताबा लष्कराने घेतला आणि…

[ad_1]

India Pakistan War :  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने ड्रोन हल्ला केला. ड्रोनच्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताकडून ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ  जारी करण्यात आला आहे. दरम्यान भारतीय सुरक्षा दलाने सर्वाबाजूने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत सर्वात मोठी अपडटे समोर आली आहे.  भारतातील 28 विमानतळांचा ताबा लष्कराने घेतला आहे.

दिल्ली विमानतळावरून उड्डाणे सुरळित सुरु आहेत. अद्ययावत सुरक्षा प्रोटोकॉलनुसार प्रवाशांना विमानातून खाली उतरवले जात आहे. 28 विमानतळ नागरी उड्डाणांसाठी बंद करण्यात आली आहे. यापैकी अनेक महत्त्वाची विमानतळे लष्करी वापरात आहेत.

आजपासून प्रवाशांना अधिक कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळावे लागतील. विमान कंपनीने 75 मिनिटे आधी बोर्डिंग करावे अशी सूचना दिली आहे. विमानतळावर ३ तास ​​आधी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीसीएएसच्या सूचनांनुसार कारवाई केली जाणार आहे. 

पाकिस्तानमधील विमानतळावर गोंधळ उडाला आहे. अनक प्रवासी 24 तासांपासून विमानतळावर अडकले आहेत. अनेक विमानतळांवर लोक अडकले आहेत. लाहोर, कराचीमधील विमानसेवा प्रभावित झाली आहे. इस्लामाबाद विमानतळावरही गोंधळ उडाला आहे. मागील काही तासां पासून अनेक  विमानांची उड्डाणे अचनाक वळवली जात आहेत. 

दरम्यान चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाकडून संभाव्य हल्ल्याचा हवाई इशारा प्राप्त झाला आहे. सायरन वाजवले जात आहेत. सर्वांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे.  भारताने पाकिस्तानचे 50 ड्रोन हल्ले उधळून लावले. पाकिस्तानने उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नरगोटा येथे मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने ते सर्व ड्रोन हल्ले उधळून लावले. भारताकडून पाकिस्तानवर 100 हून अधिक क्षेपणास्त्रं डागली. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घराजवळ ड्रोन हल्ला केला. कराची बंदरही उद्ध्वस्त करण्यात आले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *