Indian Army Recruitment 2025: महिना 1.2 लाख रुपये पगार; भारतीय सैन्यदलात नोकरीची संधी, काय आहेत पात्रतेच्या अटी ?

[ad_1]

Indian Army Recruitment 2025: भारतीय सैन्यदलाच्या वतीनं नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवेसोबतच चांगल्या पगाराची संधी या नोकरीतून मिळणार असून, एकाच वेळी दोनह गोष्टी सहज साध्य होत आहेत. रिमाउंट आणि वेटर्नरी कोर (RVC) या विभागांमध्ये नोकरीची उपलब्धता असून वेटर्नरीची पदवी असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 

पुरूष आणि महिला उमेदवारांना या नोकरीमध्ये शॉर्ट सर्विस कमीशन (SSC) साठी अर्ज करता येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे 26 मे 2025. राहिला मुद्दा नोकरीच्या पात्रता अटीचा, तर त्याचीही माहिती देण्यात आली आहे.

– या नोकरीसाठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून वेटर्नरी सायन्स विषयातील (BVSc किंवा BVSc & AH)  पदवी असणं अपेक्षित आहे. 
– भारतीय नागरिकांसह नेपाळच्या नागरिकांसाठीसुद्धा ही नोकरीची संधी उपलब्ध असेल. 
– जी मंडळी पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका, केन्या, युगांडा, तंजानिया, जाम्बिया, मलावी, ज़ैरे, इथियोपिया आणि व्हिएतनामहून भारतात कायमस्वरुपी स्थायिक होण्यासाठी आली आहेत, त्या व्यक्तीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. 

किती पदांसाठी होतेय नोकरभरती? 

  • एकूण 20 पदांसाठी ही नोकरभरती करण्यात येत असून, यामध्ये 17 पदं मुलांसाठी आणि 3 पदं ही मुलींसाठी असल्याचं वृत्त आहे. 
  • वयाची अट 
  • वरील पदांवर उपलब्ध असणाऱ्या नोकरीसाठी 26 मे 2025 पर्यंत तुमचं वय 21 ते 32 वर्षांदरम्यान असणं अपेक्षित आहे. 

काय आहे निवड प्रक्रिया? 

RVC मध्ये शॉर्ट सर्विस कमिशनसाठीची निवड प्रक्रिया 
– अर्जाची पडताळणी 
– एसएसबी मुलाखत 
– मेरिट लिस्टची घोषणा 
– निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी 
निवड झालेल्या उमेदवारांना कॅप्टन रँक दिलं जाणार असून, त्यांना आरवीसी प्रशिक्षण केंद्र, मेरठ इथं प्रशिक्षण दिलं जाईल. ही भारतीय सैन्यदलातील शॉर्ट सर्विस कमिशन नोकरी असून, एका वेगळ्या विभागात काम करण्याचा अनुभव उमेदवारांना देईल. 

किती पगार मिळणार? 

नोकरीसाठी पात्र ठरलेल्या आणि निवड फेरीतून पुढे आलेल्या उमेदवारांना पुढील तरतुदी लागू असतील. 
– लेवल-10B मॅट्रीक्सअंतर्गत 61300 रुपये मूळ वेतन. 
– 15500 रुपये मिलिट्री सर्विस पे (MSP).
– मूळ वेतनावर 20 टक्के नॉन-प्रॅक्टिस अलाउंस. 
– किट मेंटेनेंस अलाउंस (KMA), महागाई भत्ता आणि इतर भत्ते
– पगार आणि भत्त्यांची एकूण जुळवाजुळव केल्यास हा आकडा 80000 ते 120000 रुपयांच्या घरात जातो. कोणते भत्ते लागू होतात यानुसार पगाराची आकडेवारी ठरेल. 

नोकरीसाठी कसा अर्ज करावा? 

वरील पदावर नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तिथं नमूद केलेल्या पद्धतीनं नोकरीसाठी अर्ज करावा. अर्ज (21×36 सेमी) इतक्या कागदावर अधिकृत पद्धतीनं टाईप केलेला असावा. अर्ज पाठवताना बाहेरील पाकिटावर लाल रंगाच्या शाईनं “Application for Short Service Commission in RVC” असं ठळक शब्दांत लिहावं. 

हा अर्ज Directorate General Remount Veterinary Services (RV-1)

QMG Branch, Integrated Headquarters, Ministry of Defence (Army)

West Block 3, Ground Floor, Wing-4

RK Puram, New Delhi – 110066 या पत्त्यावर पाठवावा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *