[ad_1]
India Failed Pakistan Bunyan Marsous Military Operation: भारताने 7 मे रोजी मध्यरात्री पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. पाकिस्तानबरोबरच पाकव्यप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त करताना भारताने 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र भारताच्या या कारवाईने पाकिस्तान खवळला असून त्यांनी मागील दोन दिवसांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरु केला आहे. या गोळीबारामध्ये पुंछ जिल्ह्यातील 10 हून अधिक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतानेही पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
भारतातील 26 शहरांना ड्रोन्सच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न
पाकिस्तानकडून भारतीय शहरांवर ड्रोन्सच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न सुरु असून भारतीय संरक्षणदलाकडून हे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. पाकिस्तानने 9-10 मे च्या रात्रीही भारतातील 26 शहरांना ड्रोन्सच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने हा प्रयत्न हाणून पाडला. इतकेच नाही तर प्रत्युत्तर म्हणून भारताने रावळपिंडीमधील नूर खान हवाई तळ उद्धवस्त केला आहे. भारताने पाकिस्तानच्या एकूण चार हवाई तळांवर हल्ले केल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानचे सगळे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात भारताला यश
पाकिस्तानकडून रात्री भारताच्या 26 ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न. पण हे सगळे प्रयत्न भारताने परतवून लावल्याची सूत्रांची माहिती. 9 मे रोजी पाकिस्तानने भारताविरुद्ध ‘ऑपरेशन बुनियान उल मारसूस’ सुरू केल्याची केली घोषणा केली. पाकिस्तानचा हा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे. पाकिस्तानचे सगळे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात भारताला यश आलं आहे.
‘ऑपरेशन बुन्यानुन मारसूस’
पाकिस्तानकडून ‘ऑपरेशन बुन्यानुन मारसूस’अंतर्गत भारतावर फतेह मालिका बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्यात आल्यानंतर भारताने या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून ‘ऑपरेशन बुन्यानुन मारसूस’अंतर्गत भारतावर फतेह मालिका बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्यात आलं. पाकिस्तानने भारतीय वायुसेनेच्या फॉरवर्ड बेस आणि शहरांवर फतेह मालिका बॅलिस्टिक मिसाईल्स डागले. ही कारवाई भारताविरोधातील पाकिस्तानची मोठी वाढती आक्रमकता दर्शवत असली तरी भारताने त्याच आक्रमपणे पाकिस्तानला उत्तर दिलं आहे.
चार पाकिस्तानी एअर बेसवर हल्ला
भारताने प्रत्युत्तरादाखल रावळपिंडीसह पाकिस्तानमधील प्रमुख हवाई तळांवर हल्ले केले. भारतीय वायुदलाची सर्व मालमत्ता सुरक्षित असल्याची माहिती. भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये रावळपिंडीमधील नूर खान हवाई तळ उद्धवस्त झाल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. भारताने एकूण चार हवाई तळांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. श्रीनगर आणि आसपासच्या भागात जोरदार संघर्ष झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मोदींची महत्त्वपूर्ण बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुखांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. पाकिस्तानविरोधी रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
[ad_2]
Source link