Hardik Pandya: जवानाला बघून हार्दिक पांड्याने ठोकला सॅल्यूट, चाहत्यांचे जिंकले मन; Video Viral

[ad_1]

आयपीएल 2025 (ipl 2025) चा यंदाचा सीजन शेवटाकडे वळत असतानाच आता त्याचा उत्साह काही काळासाठी थांबवण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या युद्धामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केले आहे आणि ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आले आहे. सर्व क्रिकेटपटू सोशल मीडियाद्वारे पोस्ट लिहत भारतीय सैन्याचे कौतुक करत आहे याशिवाय त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, हार्दिक पांड्याने मन जिंकले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते हार्दिकचे कौतुक करताना दिसत आहेत.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये? 

भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एअरपोर्टवर प्रवेशाच्या वेळी, हार्दिकला गेटवर भारतीय जवान दिसतो. त्यांना बघताच हार्दिक त्यांना सलाम ठोकतो आणि नंतर हात मिळवतो. त्यानंतर तो जवानाच्या पाठीवर थापही  मारतो आणि निघून जातो. अशाप्रकारे हार्दिकने भारतीय सैन्याचे कौतुक केले. त्याने या आधीही  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता, त्यानंतर त्याने ऑपरेशन सिंदूर साठी भारतीय सैन्याचे खूप कौतुक केले होते.

हे ही वाचा: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, ‘या’ ट्विटमुळे आला अडचणीत; नेटिझन्सने शिकवला धडा

 

हे ही वाचा: India-Pakistan War: “बॉम्ब येत आहेत…”, DC vs PBKS सामन्यात चीअरलीडरसोबत काय झाले? Video Viral

आयपीएल रद्द

8 मे पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरु झाला आहे. भारताने पाकिस्तानवर पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून हल्ला केला. नंतर पाकिस्तानने अचानक भारतावर ड्रोन हल्ला केला. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आयपीएल 2025 वरही दिसून आला. आयपीएल एका आठवड्यासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलचे नवीन वेळापत्रक कसे असेल यावर आठवड्यानंतर चर्चा होईल.

हे ही वाचा: IPL 2025 एक आठवड्यासाठी स्थगित, BCCI कडून राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य

 

मुंबईची उत्तम कामगिरी

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ गेल्या वर्षी संघर्ष करताना दिसला. हार्दिकला आयपीएल 2024 मध्येही बरीच टीकेचा सामना करावा लागला होता. पण या हंगामात मुंबई संघ ट्रॉफीच्या जवळ जाताना दिसत आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाने सलग 6 विजयांचा विक्रम केला. पण, शेवटच्या सामन्याच्या शेवटी संघाला पराभवाचा सामना करावा लागला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *