[ad_1]
Menopause Issue POI Symptoms: महिलांमध्ये मासिक पाळी आणि प्रजननक्षमता नैसर्गिकरित्या बंद होण्याचं वय सामान्यपणे 45 वर्षानंतर किंवा त्याहीपुढे असतं. मराठीमध्ये रजोनिवृत्ती आणि इंग्रजीमध्ये मोनोपॉज म्हटल्या जाणाऱ्या ही क्रिया नैसर्गिक असली तरी एका मुलीला वयाच्या 15 व्या वर्षीच मोनोपॉज आला असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र हे खरं आहे. सध्या 30 वर्ष वय असलेल्या फ्रँकी पार्करबरोबर हा विचित्र प्रकार घडला आहे. एका दुर्मिळ विकारामुळे वयाच्या 15 व्या वर्षीच तिची मासिक पाळी थांबली. या विचित्र विकारामुळे फ्रँकीची हाडं इतकी ढिसूळ झाली आहेत की साधी कामं करतानाही आपली हाडं मोडतील की काय अशी भीती तिला वाटते.
हाडांची घनता फारच कमी
फ्रँकीला मासिक पाळी न आल्यामुळे चाचणी केली असता तिच्या ओटीपोटातील अंडायशे वयाआधीच निष्क्रीय झाल्याचं समोर आलं याला पीओआय असंही म्हणतात. पीओआयचा फूल फॉर्म प्रिमॅच्युअर ओव्हरियन इन्सफिशिएन्सी असं म्हणतात. फ्रँकीला यानंतर वारंवार चमक भरणे, मूड स्विंग, स्मरणशक्तीसंदर्भातील समस्या आणि अत्यंत कमी इस्ट्रोजेन पातळीचा त्रास सहन करावा लागला. सर्व लक्षणांमुळे तिला ऑस्टियोपेनिया झाला. या आजारामध्ये सामान्यपेक्षा हाडांची घनता फारच कमी असते. दर्शवितो परंतु ऑस्टियोपोरोसिस मानण्याइतका गंभीर नाही. याचा अर्थ असा की साधी कामे करून ‘अनेक हाडं’ मोडतील अशी परिस्थिती होण्याइतका हा गंभीर आजार नाही.
रक्त तपासणीमधून झालं निदान
कधीही मासिक पाळी न आल्याने, रक्त तपासणीनंतर फ्रँकीला पीओआय झाल्याचे निदान झाले. किशोरावस्थेमध्येच तिला वारंवार हाडे मोडण्याचा त्रास सहन करावा लागला. एकदा फ्रँकीचा खांदा मोडला आणि अनेकदा पायाची हाडं मोडली. नंतर तिला टाइप वन मधुमेह, थायरॉईडसंदर्भातील समस्या आणि मूत्रपिंडाचा दीर्घकालीन आजार असल्याचे निदान झाले. तिचे डॉक्टर अनेकदा इतर आजारांमुळे ही लक्षणे निर्माण झाल्याचं तिला सांगतात.
आयव्हीएफचाही फायदा नाही
आता, फ्रँकी आणि तिचा जोडीदार गर्भवती होण्यासाठी आयव्हीएफ उपचार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र फ्रँकीला आयव्हीएफ यशस्वी होणार नाही असे सांगण्यात आले आहे. म्हणून हे जोडपे आता मुलं दत्तक घेण्याचा विचार करत आहे.
आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या
फ्रँकी म्हणते की तिला अजूनही अधूनमधून विस्मृतीचा त्रास होतो. “मला बहुतेक रजोनिवृत्तीची लक्षणे होती आणि मी लहान वयातच मोनोपॉज आल्याच्या निदानाच्या लाजिरवाण्या अनुभवासह वर्षानुवर्षे जगले. मला फक्त माझ्या वयाच्या इतर मुलींसारखे राहायचे होते आणि मी फिट होऊ इच्छित होते. त्यावेळी, मला माझ्या शरीरात काय होत आहे हे कधीच समजले नाही, म्हणून मी त्याबद्दल कधीही बोलले नाही,” असं फ्रँकीने ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “मी एका रोलर डिस्को कार्यक्रमात असताना पडले आणि माझा खांदा मोडला. डॉक्टरांनी सांगितले की ही एक गुंतागुंतीची दुखापत आहे. तसेच मला जन्मत: 75 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीइतक्या ढीसूळ हाडांचा सांगाडा मिळाला होता,” अशी आठवण फ्रँकीने सांगितली.
पीओआय हा आजार आहे तरी काय?
तज्ञांच्या मते, पीओआय ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये महिलांच्या शरीरामधील अंडाशये सरासरीपेक्षा लवकर निष्क्रीय होतात. अंडाशय हे गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असलेल्या लहान ग्रंथीसारखे असतात. ओव्ह्युलेशनदरम्यान यामध्ये एग्ज तयार होतात आणि ती ओव्हरीजमध्ये सोडली जातात. मासिक पाळी, गर्भधारणा आणि इतर शारीरिक कार्यांसाठी हे महत्त्वाचे हार्मोन्स असतात. रजोनिवृत्तीचे सामान्य वय सुमारे 45 ते 50 वर्षे असते. काही महिलांना अचानक मोनोपॉज येऊ शकतो. त्यांना नियमित मासिक पाळी अचानक येणे बंद होते. परंतु, इतरांसाठी, POI चे निदान काही महिने किंवा वर्षभर अनियमित मासिक पाळी आल्यानंतरच होते.
पीओआयची लक्षणं काय?
उष्ण चमक भरणे
मूड स्वींग
अनियमित मासिक पाळी
लैंगिक इच्छा कमी होणे
ऑस्टिओपोरोसिस आणि हृदयरोगाचा धोका वाढणे
वंध्यत्व
[ad_2]
Source link