India Pakistan War : भारतीय सैन्यदलानं दहशतवाद्यांचे लाँचपॅड कसे उध्वस्त केले? व्हिडीओतून दाखवली धाडसी कृत्याची झलक

[ad_1]

India Pakistan War : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्ताननं सीमेपलिकडून भारताच्या सीमेवरील अनेक सैन्य तळ आणि चौक्यांवर हल्ला चढवला. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले भारतानं तितक्याच सामर्थ्यानं हाणून पाडले. किंबहुना त्यावर प्रतिहल्ले करत पाकिस्तानला स्पष्ट इशारासुद्धा दिला. 

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशाच्या सीमाभागातील संघर्षासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली. ‘पाकिस्तानने लांब पल्ल्याची शस्त्रे, ड्रोन आणि स्वार्म्सचा वापर करत भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी पाकिस्तानने प्रचंड वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र वापरून पंजाबमधील एअर बेसला लक्ष्य करण्याचाही प्रयत्न केला’, असं सांगताना लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तान जाणीवपूर्वक भारतीय संरक्षण तळांना लक्ष्य करत असल्याची बाब प्रकाशात आणली. 

तिथं पाकिस्तान लष्कराने श्रीनगर ते नलिया दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि एलओसीवर हल्ले केल्याचंही या पत्रकार परिषदेत सांगत भारतानं पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावत हवेतल्या हवेतच त्यांची अनेक क्षेपणास्त्र उध्वस्त केल्याचं ठामपमे सांगितलं. ज्यानंतर सैन्यदलाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भारताच्या वतीनं पाकिस्तानला कसं चोख प्रत्युत्तर देण्यात आलं याची झलक दाखवणारा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. 

तोफगोळ्यांच्या निशाण्यावर दहशतवाद्यांचे लाँचपॅड 

8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री पाकिस्ताननं जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या विविध शहरांवर ड्रोन हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्यदलानं पाकच्या दहशतवादी लाँचपॅडवर निशाणा साधत त्यांचा चुराडा केला, अशी माहिती सैन्यदलानं X पोस्टमधून दिली. 

नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या या लाँचपॅडवरून भारतीय नागरिक आणि संरक्षण यंत्रणांविरोधातील अनेक दहशतवादी कारवायांची आखणी आणि कटकारस्थानं रचली जात होती अशी माहितीसुद्धा सैन्यदलानं देत एका सशस्त्र कारवाईची झलक देशवासियांसमोर आणली. जिथं, या व्हिडीओमध्ये सेनिक तोफगोळे शस्त्रांमध्ये, तोफांमध्ये लोड करत शत्रूवर मारा करताना दिसत आहेत. मध्यम आकारांच्या या तोफांतून निघालेले अस्त्र अतिप्रचंड वेगानं शत्रूवर भेदक मारा करत असल्याचं या थरारक व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *