[ad_1]
- Marathi News
- National
- Demand For Satellite Images Of Pahalgam Increased 12 Times 2 Months Before The Attack
सौम्या पिल्लई14 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मोठा खुलासा झाला आहे. हल्ल्याच्या दोन महिने आधी अमेरिकेच्या ‘मॅक्सर टेक्नॉलॉजीज’ या स्पेस टेक कंपनीला या भागातील उच्च-रिझोल्यूशन उपग्रहीय छायाचित्रांच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या. ‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, जिथे सामान्यतः महिन्यातून एक-दोन ऑर्डर येतात, तिथे फेब्रुवारीमध्ये १२ ऑर्डर मिळाल्या, म्हणजेच १२ पट जास्त. दहशतवादी हल्ल्याच्या एक आठवड्यापूर्वीपर्यंत हे सुरू होते. विशेष म्हणजे, जून २०२४ मध्ये मॅक्सरने पाकिस्तानची स्थानिक कंपनी ब्यूरो ऑफ स्पॅशियल इंटेलिजन्ससह (बीएसआय) भागीदारी केली होती. बीएसआय ही पाकिस्तानी ओबैदुल्ला सैयद यांची कंपनी आहे. भागीदारी झाल्यापासून जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील भागांच्या छायाचित्रांच्या ऑर्डर वाढल्या, त्यात पहलगामव्यतिरिक्त, पुलवामा, पूंछ, अनंतनाग व राजौरीच्या छायाचित्रांची मागणीही वाढली होती. उल्लेखनीय की, अमेरिकेने ओबैदुल्लाला २०२२ मध्ये लष्करी तंत्रज्ञान पाकिस्तानसोबत सामायिक केल्याबद्दल दोषी ठरवले होते. शिक्षा पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा पाकिस्तानात सक्रिय आहे आणि बीएसआयच्या माध्यमातून जगभरातील डेटा गोळा करत आहे. आता गुप्तचर संस्था ही छायाचित्र आणि दहशतवादी हल्ला यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
इस्रो, संरक्षण मंत्रालय, ११ स्पेस टेक स्टार्टअप्सदेखील मॅक्सरचे ग्राहक
मॅक्सर भारताचे संरक्षण मंत्रालय व इस्रोसारख्या संस्थांना सेवा पुरवते. भारतातील ११ स्पेस टेक स्टार्टअप्स तिचे ग्राहक किंवा भागीदार आहेत. प्रश्न असा आहे की अशा नेटवर्कवर विश्वास ठेवणे किती योग्य आहे, जिथे तुमची प्रतिमा त्याच पोर्टलवर तो पाहत असेल जो कदाचित तुमच्या विनाशाची योजना आखत असेल? मॅक्सरच्या एका वापरकर्त्याने सांगितले की, जर भारताने कोणतीही प्रतिमा मागवली असेल, तर बीएसआयसारखे भागीदार देखील ती पाहू शकतात. हे एक सुरक्षा संकट आहे.
माेठा प्रश्न: सॅटेलाइट इंटेलिजन्स आता दहशतवाद्यांचे नवीन शस्त्र बनले का?
मॅक्सरची छायाचित्रे उच्च रिझोल्यूशनची असतात. म्हणजेच, कोणत्याही गाडीची नंबर प्लेटसुद्धा वाचली जाऊ शकते. अधिकृत भागीदार त्यांची ऑर्डर देऊ शकतात आणि जर डेटा गोपनीय नसेल, तर इतर भागीदार देखील तो पाहू शकतात. तज्ञांचे मत आहे की बीएसआयने ही छायाचित्रे पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्कसोबत सामायिक केली असतील. यामुळे सुरक्षा दलांची तैनाती, रस्ते मार्ग आणि हल्ला करण्याच्या ठिकाणांची माहिती मिळाली असेल.
मेरिकी स्पेस टेक कंपनी मॅक्सरही संशयाच्या भोवऱ्यात
मॅक्सर उपग्रहीय प्रतिमा आणि भू-स्थानिक डेटा पुरवते. त्याचा वापर अमेरिकेची संरक्षण संस्था नाटो, नासा व भारतीय संस्थाही करतात. पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची कंपनी बीएसआयसोबत भागीदारी केल्यामुळे मॅक्सर संशयाच्या भाेवऱ्यात आहे. अमेरिकेने यापूर्वीच बीएसआयला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक मानले आहे. असे असूनही, तिला मॅक्सरची भागीदार बनवणे आणि त्यानंतर भारताच्या संवेदनशील भागातील छायाचित्रांपर्यंत तिची पोहोच देणे हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळण्यासारखे आहे.
[ad_2]
Source link