धोनी न बोलताच खूप काही बोलून गेला… अनोख्या पद्धतीने दिला भारतीय सैन्याला पाठिंबा, Video Viral

[ad_1]

MS Dhoni T-Shirt Viral Video: भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी, त्याचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्याचे कौतुक करत आभार मानण्यासाठी अनेक क्रिकेटर्सनी सोशल मीडियाचा वापर केला. पण, धोनीची कोणतीही पोस्ट किंवा स्टोरी सोशल मीडियावर दिसली नाही. यामुळे धोनीला खूप ट्रोलही करण्यात आलं. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाबद्दल धोनी पोस्ट का करत नाही, असे प्रश्न अनेक वेळा उपस्थित केले गेले. परंतु रविवारी धोनीने काहीही न बोलता एक मोठा संदेश दिला. त्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

का होतोय धोनीचा ती-शर्ट व्हायरल?

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी अलीकडेच एका फ्लाइटमध्ये दिसला. धोनीचा या फ्लाइट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक गोष्ट सतत लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तो काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. या टी-शर्टवर फारच छान शब्द लिहले होते. त्यावर लिहले होते  ‘कर्तव्य,  सन्मान, देश’ असे शब्द लिहून एक संदेश दिला. या टी-शर्टचा संदेश खूपच प्रभावी होता आणि सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. एका व्यक्तीने फ्लाइटमध्येच धोनीचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा: MS Dhoni भारतीय सैन्यात आहे ‘या’ पदावर, त्याला किती पगार मिळतो माहितेय? जाणून घ्या

 

हे ही वाचा: “सिलेक्टर्सनी ऑफर दिली असावी…” वीरेंद्र सहवागने उलगडले रोहित शर्माच्या टेस्ट निवृत्तीमागचे कारण

 

धोनी आणि सैन्याचे कनेक्शन

क्रिकेटपडू धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर धोनीला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल बनवण्यात आले होते.  

हे ही वाचा: ‘या’ तारखेपासून पुन्हा सुरू होणार IPL 2025, BCCI करणार नवीन वेळापत्रक जाहीर करणार

 

IPL 2025  लवकरच होणार सुरु 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल 2025 सध्या स्थगित करण्यात आले आहे. आता सगळेच लोक ही स्पर्धा पुन्हा सुरु होण्याची वाट पाहत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, लीग गुरुवार किंवा जास्तीत जास्त शुक्रवार (16-17 मे) पर्यंत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय सुधारित वेळापत्रक लवकरच जारी करणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *