प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 13 जुलै : पनवेल विधानसभेचे माजी आमदार शेकापचे नेते विवेक पाटील यांनी तुरुंगातून लेटर बॉम्ब टाकल्याने खळबळ उडाली आहे. माजी आमदार विवेक पाटील यांनी पत्र लिहून आपण सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असून, आपल्याला अनेक पदापर्यंत पोहचवलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. या पत्रानंतर कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. अचानक निर्णय घेतल्याने कार्यकर्ते संभ्रमात पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा आमदार सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान असलेले विवेक पाटील यांनी राजकीय निवृत्तीबाबत कुणाशीही चर्चा न करता थेट अशा प्रकारचा निर्णय का घेतला? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. गेली 2 वर्ष विवेक पाटील कर्नाळा बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात आहेत. याआधी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, त्यांच्या प्रकृतीबाबत खूप गंभीर आजाराशी ते आजही लढत आहेत. लिहिलेल्या पत्रातही त्यांनी आजारपणाचे कारण दिले आहे. शेकापला नवसंजीवनी मिळेल अशी आशा करत असताना त्यांनी राजकारणातूनच बाहेर निवृत्ती घेणार असल्याच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. वाचा –
‘दिल्लीपुढे सह्याद्री कधी झुकला नाही, पण दिल्लीवाऱ्या पाहिल्या तर..’ रोहित पवारांचा रोख कुणाकडे?
विवेक पाटील म्हणाले की, तुम्हाला माहीत आहे ४ वर्षांपूर्वी एका जीवघेण्या आजारातून तुम्हा सर्वांच्या सद्भावना व आशीर्वादामुळे मी बरा झालो. आता पुन्हा त्याच आजाराने मी त्रस्त आहे. शारीरिक व्याधीमुळे मला यापुढे काम करणे शक्य होणार नाही. तसेच माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा देत आहे. त्यामुळे मी सक्रीय राजकारणातून निवृत्त होत आहे.
News18लोकमत
घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतील की फेरविचार होणार याचा निर्णय तेच घेतील : बाळाराम पाटील विवेक पाटील यांच्या निर्णयाने शेकापला उभारी देणारा नेताच नसल्याने पनवेल उरण तालुक्यातील शेकापचे भविष्य काय असेल आणि विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ते भविष्यात काय निर्णय घेतात की विवेक पाटील सुखरूप बाहेर असल्यावर त्यांना मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी शेकाप कार्यकर्ते आग्रह करणार का? हे पुढील काळात स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.