[ad_1]
India Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामध्ये युद्धविरामाचं आणि शस्त्रसंधीचं वळण आलेलं असतानाच सोमवारी भारत आणि पाकिस्तानचे DGMO एकमेकांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली. पाकिस्तानसोबत सिंधू करार आणि व्यापार स्थगितच राहणार असून या चर्चेत पाकिस्तानशी दहशतवादाशिवाय इतर कोणत्याची विषयावर चर्चा होणार नाही हे सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं.
इथं ही महत्त्वाची चर्चा होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानीसद्धा एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख बैठकीसाठी हरज राहिले. पण, या साऱ्यामध्ये ज्या शस्त्रसंधीची सर्वप्रथम चर्चा पाकिस्ताननं डीजीएमओंशी केली ती व्यक्ती आहेत तरी कोण? त्यांची नेमकी जबाबदारी काय? हा प्रश्न अनेकांनाच पडला. तर, डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशंस (DGMO).
भारतीय सैन्यदलात या पदाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त असून, एखाद्या थ्री स्टार लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकाऱ्याची या उच्चस्तरीय पदावर निवड केली जाते. मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये ऑक्टोबर महिन्यात लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्यावर या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. साऊथ ब्लॉक स्थित सैन्यदलाच्या मुख्यालयात त्यांनी पदभार स्वीकारला.
राजीव घई यांच्या कारकिर्दीवर एक नजर
इंडियन मिलिट्री अकॅडमी (IMA) देहरादून इथून राजीव घई यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलं. ज्यानतर 1989 मध्ये त्यांनी कुमाऊं रेजिमेंमटमध्ये सेवा सुरू केली. जवळपास दीड वर्षांसाठी श्रीनगर स्थित चिनार कोर (15 वी कोर)च्या कमांडिंग इन चीफ या पदावरही ते सक्रिय होते. याच दरम्यान त्यांनी एलओसी अर्थात नियंत्रण रेषेवरील संरक्षमासोबतच काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये मोलाचं योगदान दिलं होतं.
ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका
पहलगाम हल्ल्याच्या परफेडीसाठी भारतानं पुकारलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतही घई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मद, लश्कर ए तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या ज्या दहशतवादी तळांवर भारतीय सैन्यानं आघात केला त्यांना चिनार कोरच्या कमांडरसह डीजीएमओंनीच हेरलं होतं.
कशी होते डीजीएमओ या पदासाठीची निवड?
भारतीय सैन्यदलात डीजीएमओ या पदासाठीची निवड सैन्यदलप्रमुख आणि संरक्षण मंत्रालयाकडून संयुक्तरित्या केली जाते. यामध्ये उमेदवाराच्या सैन्यदलातील कारकिर्दीचा आढावा घेत त्यांची नेतृत्त्वंक्षमता पाहत त्यानुसार त्यांच्या अनुभवांचं मूल्यांकन होतं.
DGMO पदावरील अधिकाऱ्यांकडे कोणती जबाबदारी असते?
DGMO पदाची जबाबदारी स्वीकारणारे अधिकारी सैन्यदलाच्या महत्त्वपूर्ण मोहिमांची आखणी करतात. त्यांच्या कामाची दखल आि पाहणी थेट सैन्यदलप्रमुख घेत असतात. DGMO सैन्य, नौदल आणि वायुदलामध्ये समन्वय राखतात. सोबतच नियंत्रण रेषेवर तणाव कमी करणं, गोळीबार थांबवणं, गुप्तचर यंत्रणांची माहिती हेरत कोणत्याही अटीतटीच्या क्षणासाठी सैन्यदल तयार ठेवणं अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या DGMO वर सोपवण्यात येतात. युद्धजन्य परिस्थिती किंवा कोणा एका तणावाच्या वेळी DGMO एनएसए, केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाशी थेट समन्वय साधतात.
[ad_2]
Source link