Ind – Pak शस्त्रसंधीनंतर देशातील ‘ती’ 32 विमानतळं पुन्हा सुरू; कधी आहे तुमचं फ्लाईट? आताच पाहा स्टेटस

[ad_1]

India-Pakistan Ceasefire Airports Latest Update : पहलगाममधील दहशतवादी हल्ला, त्यामागोमागच भारतीय लष्करानं दिलेलं या ह्ल्याचं उत्तर अर्थात ऑपरेशन सिंदूर. या संपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून उत्तर भारतातील जवळपास 32 विमानतळं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने जारी केला होता. ज्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशांमधील तणाव विकोपास केलेला असताना शस्त्रसंधी लागू होता युद्धविराम झाला आणि पुन्हा एकदा सीमाभागातील तणाव निवळू लागला. 

संकटांचं हे सावट कमी होत असल्याची चिन्हं असतानाच देशातील हवाई वाहतूक पूर्वपदावर आणण्याच्या हेतूनं भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सूचना जारी करत सर्व बंद विमानतळं तात्काळ प्रभावाने नागरी कामकाजासाठी खुली करणार असल्याचं जाहीर केलं. 

सर्व बंद विमानसेवा आजपासून सुरू 

सोमवार, 12 मे 2024 रोजी सकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तणावाच्या परिस्थितीमध्ये श्रीनगर, अमृतसर आणि इतर ३२ विमानतळ बंद करण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून होणारा हवाई हल्ल्यांचा प्रयत्न पाहता सावधगिरी म्हणून ही विमानतळं बंद करण्यात आली होती. आता मात्र सर्व विमान कंपन्यांनी विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये नियोजित प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, लेह, श्रीनगर यांसारख्या भागांमध्ये भारत पाकिस्तान तणावादरम्यान अडकलेल्या देशाच्या विविध राज्यातील प्रवाशांच्या परतीच्या प्रवासाचा मार्ग आता खऱ्या अर्थानं मोकळा झाला आहे. 

कोणत्या विमानतळांवरील नागरी वाहतूक पुन्हा सुरू? 

अधमपुर, अंबाला, अमृतसर, अवंतीपुर, बठिंडा, भुज, बीकानेर, चंडीगढ़, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपुर, कांडला, कांगड़ा (गग्गल), केशोद, किशनगढ़, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठानकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हीरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थोइस आणि उत्तरलाई ही विमानतळं पुन्हा एकदा कार्यान्वित होत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *