विराट , डेनिस, थॉमसन… पाकिस्तानला धडा शिकवल्यावर भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेत का घेण्यात आली 3 क्रिकेटर्सची नावं?

[ad_1]

Virat Kohli Test Retirement : भारत पाकिस्तान यांच्या सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. तेव्हा DGMO लेफ्टिनेंट जनरल राजीव घई (Rajiv Ghai) यांनी एअर मार्शल एके भारती आणि नेव्हीचे वाईस एडमिरल एएन प्रसाद यांच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईबाबत रिपोर्ट सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदे दरम्यान डायरेक्टर मिलिस्ट्री ऑपरेसंश लेफ्टिनेंट जनरल राजीव घई यांनी क्रिकेटचा उल्लेख करत असताना 3 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची नाव घेतली. यात भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या नावाचा नावाचा सुद्धा समावेश होता. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टेस्ट क्रिकेटमधून घेतलेली निवृत्तीचा उल्लेख करताना त्यांनी भारतीय सैन्याने तिन्ही विभागांमध्ये आपली मजबूत पकड ठेवली असून पाकिस्तानच्या कुरापतींना चोख उत्तर दिल्याचे सांगितले. 

क्रिकेटचं उदाहरण देऊन समजावलं : 

डायरेक्टर मिलिस्ट्री ऑपरेसंश लेफ्टिनेंट जनरल राजीव घई यांनी भारतीय सैन्याने पाकिस्तानला प्रतिउत्तर येत असताना केलेल्या कारवाईविषयी सोप्या भाषेत समजावताना म्हटले की, एक उदाहरण देऊएक एसपेक्ट हाईलाइट्सविषयी समजावू इच्छितो की, ‘माझ्या माहितीनुसार ७० व्या दशक होतं. तेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात टेस्ट सामना खेळवला जात होता. आज इथे क्रिकेट विषयी सुद्धा बोललं गेलं पाहिजे कारण मी पाहत होतो की आज विराटने सुद्धा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे’. 

राजीव घई यांनी विराटला त्यांचा आवडता क्रिकेटर म्हणत पुढे सांगितले की, ‘अनेक भारतीयांप्रमाणे विराट कोहली माझा सुद्धा आवडता आहे. 70 व्या दशकात एशेज सीरीज सुरु होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे 2 वेगवान गोलंदाज ज्यांच क्रिकेटमध्ये खूप मोठं नावं आहे. त्यांनी इंग्लंडच्या बॅटिंग लाईनअपला उध्वस्त केले होते.  यावेळी ऑस्ट्रेलियाने एक म्हण सुरु केली होती की, ‘From Ashes To Ashes From Dust To Dust, If Thomson Don’t Get Ya, Lillee Must.म्हणजेच राख ते राख आणि धूळ ते धूळ पर्यंत जर थॉमसन तुम्हाला मिळत नाही तर लिलीला नक्कीच मिळायला हवं. जर तुम्ही हा लेयर पाहाल तर तुम्हाला कळले की मी तुम्हाला काय समजावू इच्छितो. त्या काळात डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांची घातक गोलंदाजी फलंदाजांचे मनोबल तोडण्यासाठी प्रसिद्ध होती’. 

हेही वाचा : ‘तू खेळासाठी जे काही केलंस ते….’ विराटच्या निवृत्तीनंतर त्याच्या मोठ्या भावा बहिणीची पहिली प्रतिक्रिया

 

डायरेक्टर मिलिस्ट्री ऑपरेसंश लेफ्टिनेंट जनरल राजीव घई  यांना हे उदाहरण देऊन सांगायचे होते की, ‘जर का पाकिस्तान सर्व सिस्टम पार करून गेला देखील तरी ही एयरफील्ड किंवा लॉजिस्टिक इंस्टॉलेशन किंवा ज्याला ही तुम्ही टार्गेट करताय त्यापूर्वी या लेअर ग्रेड सिस्टमला त्यांना पाडावे लागेल. जी दुर्दशा तुम्ही पाकिस्तानची पाहिलीत, आपली एअरफिल्ड सर्व प्रकारे पाकिस्तानला उध्वस्त करण्यासाठी सक्षम आहे’. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *