प्रवीण दरेकरांसह 3 भाजप आमदार लिफ्टमध्ये अडकले, संकटमोचक महाजनांनी केली सुटका


तुषार रुपनवार, प्रतिनिधी मुंबई, 13 जुलै : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे खाते वाटपाची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, अचानक लिफ्टमध्ये 3 आमदार अडकल्याची घटना घडली. पण, वेळीच या तिन्ही आमदारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी वेळीच धाव घेऊन तिन्ही आमदारांना बाहेर काढलं, असल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडीमध्ये भाजपच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत राज्यभरातून भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर आहे. भिवंडीतील एका रिसॉर्टमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. आज लिफ्टमधून जात असताना अचानक 3 आमदार अडकले. प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे आणि श्वेता महाले लिफ्टमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.

News18लोकमत


News18लोकमत

घटनेची माहिती मिळताच भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीष महाजन हे लगेच मदतीला धावून आले. गिरीष महाजनांच्या मदतीने तिन्ही आमदारांची सुटका करण्यात आली. लिफ्टचा दरवाजा वाकवत महाजन यांनी आमदारांना बाहेर काढले. अचानक लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *