मशरूमने चालणारे रोबोट तयार – ना वीज हवी, ना बॅटरी!: मशरूमचे मायसेलियम नेटवर्क न्यूरॉन्ससारखे करते कार्य; हार्डवेअरशी जोडलेले

[ad_1]

दिव्य मराठी नेटवर्क | न्यूयॉर्ककाही सेकंदांपूर्वी

  • कॉपी लिंक

कॉर्नेल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मशरूमच्या मुळासारख्या धाग्यांपासून (मायसेलियम) दोन अद्वितीय रोबोट तयार केले आहेत. हे रोबोट सामान्य वीज किंवा बॅटरीद्वारे नियंत्रित केले जात नाहीत तर ते जिवंत मशरूमद्वारेच नियंत्रित केले जातात. एक रोबोट चाकावर फिरतो, तर दुसरा पाच पाय असलेला मऊ रोबोट आहे, जो हळूहळू हालचाल करतो.

शास्त्रज्ञांनी मशरूमच्या मायसेलियमला ​​रोबोटच्या हार्डवेअरशी जोडले आहे. मायसेलियम इलेक्ट्रोडद्वारे वाचले जाणारे लहान विद्युत सिग्नल तयार करते. हे सिग्नल रोबोटच्या हालचाल करणाऱ्या भागांवर नियंत्रण ठेवतात. जेव्हा रोबोट्सना अल्ट्राव्हायोलेट प्रकाश दाखवण्यात आला तेव्हा त्यांनी त्यांची दिशा आणि हालचाल बदलली. कारण मशरूमला प्रकाश आवडत नाही. अर्धे मशरूम, अर्धे मशीन: संशोधकांनी ऑनलाइन किटमधून किंग ऑयस्टर मशरूम वाढवले. ​​कारण ते लवकर वाढतात. त्याचे मायसेलियम नेटवर्क न्यूरॉन्ससारखे कार्य करते, सिग्नल पाठवते आणि पोषक तत्त्वांची वाहतूक करते. शास्त्रज्ञ आनंद मिश्रा म्हणाले की, मायसेलियमचे सिग्नल खूप हलके असतात म्हणून त्यांना वाचण्यासाठी एक विशेष विद्युत इंटरफेस बनवण्यात आला होता, जो या सिग्नलना डिजिटल डेटामध्ये रूपांतरित करतो.

तारांविना चालू शकतात

या रोबोटचे संशाेधक रॉबर्ट शेफर्ड यांनी सांगितले की, हे रोबोट काेणत्याही तारांविना चालतात. भविष्यात ते मातीची तपासणी करू शकतात अाणि पिकांसाठी खताची याेग्य मात्राही ठरवू शकतात. यामुळे पर्यावरणाचे नुकसानही कमी हाेईल.

शक्यता आणि चिंता

वेस्ट इंग्लंड विद्यापीठाचे प्राध्यापक अँड्रयू अॅडमॅट्झकी म्हणतात की, बुरशीपासून बनवलेले उपकरण वायू प्रदूषणासारख्या पर्यावरणीय बदलांवर लक्ष ठेवू शकतात. तथापि, साउथम्प्टन विद्यापीठाचे राफेल मेस्त्रे यांनी इशारा दिला की, असे रोबोट मोठ्या संख्येने जंगलात किंवा समुद्रात सोडले गेले तर ते पर्यावरणालाही हानी पोहोचवू शकतात. सध्या हे रोबोट फक्त प्रयोगशाळांपुरते मर्यादित आहेत, परंतु भविष्यात त्यांचा वापर शेती, पर्यावरण देखरेख आणि आपत्ती निवारण यासारख्या क्षेत्रात केला जाऊ शकतो. बुरशीपासून बनवलेल्या रोबोट्सची वैशिष्ट्ये कार्नेगी मेलॉन विद्यापीठाच्या प्राध्यापक व्हिक्टोरिया वेबस्टर-वूड म्हणाल्या की, हा अभ्यास विशेष आहे. कारण यात पहिल्यांदाच बुरशीचा वापर केला आहे. बुरशी जिवंत ठेवणे सोपे आहे, ज्यामुळे हे रोबोट शेती व सागरी देखरेखीसाठी अधिक योग्य बनतात.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *