मराठी मुलगी – तेलुगू मुलानं सुरू केलं फ्युजन स्टार्टअप, मुंबईकरांना नवी मेजवानी


मुंबई, 13 जुलै :  भांडणापासून सुरू झालेल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, प्रेमाला जीवनसाथी बनवले आणि आता जीवनाचा जोडीदार बिझनेस पार्टनर आहे. तुम्हाला ही गोष्ट फिल्मी वाटत असेल, पण हे वास्तव आहे.
मुंबईतील
दादरमध्ये सध्या चर्चेत असलेल्या ‘फ्युजन हट मोमोज’  या स्टार्टअपच्या मालकांची ही खरी गोष्ट आहे. लाईफ पार्टनर ते बिझनेस पार्टरनर असा प्रवास त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. कशी झाली सुरुवात? मूळचा तेलुगू असलेला नवीन चागलेटी आणि मराठी मुलगी नीलंबरी सुर्वे या जोडप्याचं हे स्टार्टअप आहे. ही दोघं गेली 6 वर्ष घरच्यांच्या संमतीने एकत्र आहेत. नवीन कामानिमित्त दादर परिसरात एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. अनेक ठिकाणी काम करत होता. कोरोना नंतर जॉब गेल्यावर त्याने बराच काळ एका फूड डिलिव्हरी कंपनीत काम केलं.

News18लोकमत


News18लोकमत

स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची नवीनची इच्छा होती. त्यामधून त्यानं नीलंबरीशी चर्चा करून मोमोज विक्री करण्याचं ठरवलं. नवीनच्या या स्वप्नाला नीलांबरीनंही भक्कम साथ दिली. त्यानंतर या दोघांनी हे स्टार्टअप सुरू केलंय. काय आहे खासियत? ‘फ्युजन हट’ या स्टॉल वर वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज मिळतात. व्हेज, नॉन व्हेज दोन्ही प्रकार इथं उपलब्ध आहेत. या स्टॉलवरील कुरकुरे मोमोज, अफगाणी मलाई मोमोज, तंदुरी मोमोज हे स्पेशल पदार्थ आहेत. 60 ते 150 रुपयांच्या रेंजमध्ये हे पदार्थ मिळतात. रोज संध्याकाळी इथं मोठी गर्दी असते.
श्रावण महिन्यात चिकन खाण्याची झाली इच्छा? तर ट्राय करा हा व्हेज प्रकार, Video
नीलंबरी मराठी मुलगी असून मी तेलुगू मुलगा आहे. त्यामुळे आमचं एक वेगळं फ्युजन आहे. आम्ही एकत्र व्यवसायालाही फ्युजन हट हे नाव दिलंय. या व्यवसायाला नीलंबरी आणि नीलंबरी आणि तिच्या घरच्यांनी खूप पाठिंबा दिला आहे. शनिवार रविवार किंवा वेळ असेल तेव्हा तिच्या घरातील सदस्य आम्हाला मदत करतात, असं नवीननं सांगितलं. ‘आमचं सहा वर्षांपासून प्रेम आहे. नवीनच्या सुखात आणि दु:खात सहभागी होणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. आता आमची मोमोजवाले कपल म्हणून आम्हाला अनेक जण ओळखत आहेत, असं नीलंबरीनं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *