आता मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन सोडाच! पोस्ट ऑफिसची लहान मुलांसाठी जबरदस्त योजना; परतावाही चांगला

[ad_1]

Post Office Scheme: मुलांच्या करिअरसाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी पालक आधीपासूनच विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जेणेकरुन मुलांचं भविष्य सुरळीत व्हावे. पालक एलआयसी, विविध बँकाच्या एफडी यामध्ये गुंतवणुक करतात. मुलांच्या भविष्यासाठी पोस्ट ऑफिसनेदेखील एक योजना आणली आहे. या योजनेत गुंतवणुक केल्यास परतावातर चांगला मिळेल. या योजनेमुळं मुलांचे भविष्य सुरक्षित होईल. 

पोस्ट ऑफिसकडून विविध योजना सातत्याने आणल्या जातात. पोस्ट ऑफिस सरकारी असल्याकारणाने सुरक्षिततेचीही चिंता करण्याची गरज नाही. लहान मुलांसाठी अशीच एक योजना पोस्ट ऑफिसने आणली आहे. या योजनेचे नाव बाल जीवन विमा योजना, असं आहे. ही एक विमा योजना असून विशेषतः मुलांसाठी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गंत ही योजना चालवली जाते. या योजनेत मुलांना लाइफ इन्शुरन्स कव्हरसह मॅच्युरिटीवर 3 लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम मिळते. तसंच, एंडोमेंट पॉलिसीसारखा बोनसदेखील आहे. 

चाइल्ड लाइफ इन्शुरन्स योजनेत पोस्टल लाइफ इन्शुरन्स (पीएलआय) आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स (आरपीएलआय) अतंर्गंत स्वतंत्र विमा रक्कम दिली जाते. पीएलआयअंतर्गंत 3 लाख रुपयांतर्गंत विमा रक्कम मिळते. तर आरपीएलआयअंतर्गंत पॉलिसीधारकाला 1 लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम मिळेल. मात्र या दोन्हींचा हफ्ता मात्र वेगळा आहे. 

पॉलिसीप्रमाणेच यात एंडोमेंट पॉलिसीप्रमाणेच बोनसचा ही समावेश आहे. रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सअंतर्गंत जर तुम्ही ही पॉलिसी घेत असाल तर तुम्हाला 1000 रुपयांच्या विमा रकमेवर दरवर्षी 48 रुपयांचा विमा दिला जातो तर पोस्टल लाइफ इन्शुरन्सअतंर्गंत दरवर्षी 52 रुपयांचा बोनस दिला जातो. पोस्ट ऑफिस चाइल्ड लाइफ इन्शुरन्स हा मुलांचे पालक खरेदी करू शकतात. तसंच, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलांना मिळू शकतो. तसंच, ही योजना 5 ते 20 वर्षे वयोगटातील मुलांसाठी घेऊ शकतात. ज्या पालकांना आपल्या मुलांसाठी ही विमा योजना खरेदी करायची आहे. त्यांचं वय 45 पेक्षा जास्त नसावं. 

पालकांनी 5 वर्षे नियमित प्रिमीयम भरल्यानंतर ही पॉलिसी पेड-अप पॉलिसी बनते. मात्र एकदा का ही योजना घेतल्यानंतर प्रीमियम भरण्याची जबाबदारी पालकांची असते. मात्र पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी पालकांचा मृत्यू झाल्यास मुलाचा प्रिमियम माफ केला जातो. तसंच, मुलाचा मृत्यू झाल्यास मुलाचा प्रिमीयम माफ केला जातो. मुलाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला बोनससह विम्याची रक्कम दिली जाते. 

या योजनेत तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक गुंतवणूक करू शकता. इतर सर्व पॉलिसींप्रमाणे या योजनेवर कर्जाची सुविधा उपलब्ध नाही. मुलांसाठी ही पॉलिसी घेताना वैद्यकीय तपासणीची गरज नाही. मात्र, मूल निरोगी असणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, या योजनेत पॉलिसी सरेंडर करण्याची तरतूद नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *