PBKS vs DC सामन्याबाबत आला निर्णय, BCCI ने प्रीती झिंटाला दिला मोठा धक्का!

[ad_1]

PBKS vs DC Match Result:  धर्मशाला येथे खेळला जात असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना थांबवण्यात आला होता. त्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आलं होतं.  त्या वेळी पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 10.1 षटकांत 122 धावा केल्या होत्या. जर पंजाब हा सामना जिंकला असता, तर तो प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करणारा पहिला संघ बनला असता. मात्र, आता बीसीसीआयने जेव्हा नव्या वेळापत्रकाची घोषणा केली, तेव्हा पंजाबसाठी मोठी निराशा समोर आली आहे.

संघाची दमदार कामगिरी 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने यंदा दमदार कामगिरी केली आहे. संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले असून, त्यापैकी 7 विजय मिळवले तर 3 मध्ये पराभव झाला. 11 पैकी  1 सामना अनिर्णीत राहिला आहे. पंजाब सध्या 15 गुणांसह टेबल पॉइंट्सवर तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. दिल्ली कॅपिटल्सही प्लेऑफच्या शर्यतीत असून अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली टीम भक्क्कपणे उभी होती. याशिवाय  धर्मशालेमधील सामन्यात दिल्लीचे गोलंदाज पंजाबसमोर अपयशी ठरले होते. आता या सामन्याबाबत बीसीसीआयचा अधिकृत निर्णय समोर आला आहे, जो पंजाबसाठी झटका ठरला आहे. 

हे ही वाचा: भारताचा जावई जाणार पाकिस्तानला! बनला ‘या’ संघाचा प्रशिक्षक, शिकवणार गोलंदाजी

 

पुन्हा सुरू होणार PBKS vs DC सामना

हा सामना त्या दिवशी थांबल्यावर सगळ्यांच्याच डोक्यात असा प्रश्न होता की, हा सामना थांबलेल्या ठिकाणावरूनच पुढे सुरू होईल का? की पुन्हा नव्याने खेळवला जाईल? बीसीसीआयने याबाबत स्पष्टता दिली असून, हा सामना पहिल्या चेंडूपासून म्हणजेच पुन्हा नव्याने सुरू केला जाणार आहे.

हे ही वाचा: कोहली 4-5 दिवसांपूर्वीच तयार… अचानक घेतलेल्या निवृत्तीवर रणजी प्रशिक्षकाचा विराटबद्दल मोठा खुलासा

कधी आणि कुठे होणार सामना?

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना शनिवार, 24 मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल.

हे ही वाचा: Imran Khan News: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? पाकिस्तान सरकारने काय म्हटलंय जाणून घ्या

हे ही वाचा: MS Dhoni भारतीय सैन्यात आहे ‘या’ पदावर, त्याला किती पगार मिळतो माहितेय? जाणून घ्या

IPL 2025 चा अंतिम सामना 3 जूनला

IPL 2025 च्या उर्वरित सामन्यांना 17 मेपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना आरसीबी आणि केकेआर यांच्यात बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल. एकूण 13 लीग सामने 6 ठिकाणी होतील, ज्यात 2 डबल हेडर असतील. प्लेऑफ सामन्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, मात्र अजून प्लेऑफचे सामने कुठे होणार हे ठरलेलं नाही.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *