Top 5 Course After 10th : दहावीनंतर करा टॉप 5 शॉर्ट टर्म कोर्सेस, लाखोंमध्ये असेल पगार

[ad_1]

दहावीच्या बोर्डाचा आणि CBSE चा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक मुलं आपल्या करिअरचा विचार करत आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना असे काही कोर्सेस करायचे आहेत जे करुन त्यांना भविष्याची चिंता मिटेल. जर तुम्हाला देखील दहावीनंतर कोर्स करायचा असेल ज्यामुळे तुम्हाला चांगला पगार मिळेल तर हे 5 असे कोर्सेस सांगत आहोत ज्यामुळे तुमचं करिअर नक्कीच सेट होईल यात शंका नाही. 

ITI कोर्स 

आयटीआय कोर्समध्ये इलेक्ट्रिशयन, फिटर, वेल्डर, मशीनिस्ट, मोटर मॅकेनिक, वायरमन सारख्या कोर्सचा समावेश आहे. आयटीआय कोर्सचा कालावधी 6 महिने ते 2 वर्षांपर्यंतचा आहे. या कोर्सनंतर तुम्ही सरकारी किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये दोन्ही ठिकाणी नोकरी करु शकता. 10 वी नंतर आयटीआय डिप्लोमाला चांगली मागणी आहे. 

कम्प्युटर ऍप्लिकेशन डिप्लोमा 

दहावीनंतर तुम्ही कॉम्प्युटर ऍप्लीकेशन डिप्लोमा कोर्स करु शकता. या कोर्सचा कालावधी 1 ते 2 वर्षे आहे. या  कोर्समध्ये तुम्हाला MS Office, Tally, Basic Programming, Internet Tools बद्दल शिका. या कोर्सनंतर तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेटर, डाटा एंट्री ऑपरेटर, क्लर्कसह अनेक नोकऱ्या करु शकतात.

हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स 

दहावीनंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स अतिशय डिमांडवाला कोर्स आहे. यामध्ये फूड प्रिपरेशन, हाऊसकिपिंग, हॉटेल फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट शिकू शकता. यानंतर तुम्ही कोणत्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सहज नोकरी करु शकता. या कोर्सनंतर तुम्हाला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते. 

डिजिटल मार्केटिंग

या कोर्सच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग टूल्स, सोशल मीडिया एडवर्टायजिंग, ईमेल मार्केटिंग आणि अन्य ऑनलाईन मार्केटिंग देखील शिकू शकता. या कोर्सचा कालावधी 3 महिने ते 12 महिनेपर्यंत असतो. या कोर्सनंतर चांगली सॅलरी पॅकेज मिळते. 

या कोर्स व्यतिरीक्त वेब डिझाइनिंग, डेव्हलपमेंट, लँग्वेज लर्निंग, मल्टी मीडिया, हेल्थ वर्कर, नर्सिंग असिस्टेंट कोर्स, फॅशन डिझायनिंग, फोटोग्राफी सारखे कोर्सेस देखील आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *