61 व्या वर्षी लग्न करणाऱ्या भाजपा नेते दिलीप घोष यांच्यावर दु:खाचा डोंगर; लग्नाच्या काही दिवसांतच…

[ad_1]

भाजपा नेते दिलीप घोष यांच्या 26 वर्षीय सावत्र मुलाचा मृत्यू झाला आहे कोलकातामधील फ्लॅटवर त्यांच्या मुलाला मृतदेह आढळला. श्रींजय दासगुप्ता हा रिंकू मजुमदार यांचा मुलगा होता. रिंकू मजुमदार आणि दिलीप घोष यांनी नुकतंच लग्न केलं होतं. श्रींजय दासगुप्ता हा त्यांच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा होता. लग्नानंतर तीन आठवड्यातच त्यांच्या मुलाला मृत्यू झाला आहे. श्रींजय दासगुप्ता आयटी कंपनीत कामाला होता आणि न्यू टाऊनमधील एका भाड्याच्या घरात राहत होता. 

मजुमदार आणि श्रींजय हे न्यू टाऊनमधील घरात एकत्र राहत होते. पण लग्न झाल्यानंतर त्या घोष यांच्या घरी शिफ्ट झाल्या होत्या. रात्री त्यांना श्रींजयच्या प्रेयसीचा फोन आला होती. ती त्यावेळी त्याच्यासह फ्लॅटमध्ये होती. श्रींजयची तब्येत बरी नसल्याचं समजताच रिंकू मजुमदार यांनी धाव घेतली होती आणि त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. पण तिेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. 

शवविच्छेदन अहवालात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. श्रींजयचा मृत्यू तीव्र रक्तस्रावी स्वादुपिंडाचा दाह’, जो स्वादुपिंडाचा दाहचा एक गंभीर प्रकार आहे, यामुळे झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 

रिंकू मजुमदार यांनी माध्यमांना सांगितले की त्यांचा मुलगा न्यूरोलॉजिकल समस्येने ग्रस्त होता आणि त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. त्यांनी पुढे सांगितलं की, मी फ्लॅट सोडल्यानंतर तो तणावाखाली होता. “मला कळलं आहे की तो नीट जेवत नव्हता आणि नियमितपणे औषधही घेत नव्हता. त्याने मला कधीही सांगितलं नाही, परंतु आई असल्याने मला तो अस्वस्थ असल्याचं जाणवत होतं”.

आपण श्रींजयला आपल्यासोबत नेण्याची योजना आखत होतो असंही त्यांनी सांगितलं. “लग्नानंतर तो नाराज असल्याचं त्याने मला कधी सांगितलं नाही. त्याच्या मित्रांनी मला त्याला सोबत नेण्यास सांगितलं होतं. तो मित्रांना सांगायचा की, तुम्ही घरी गेल्यावर पालक दिसतात पण मला नाही,” असं त्या म्हणाला. त्याने मदर्स डे च्या दिवशी घरी येऊन मला गिफ्ट दिले होते असंही त्यांनी सांगितलं. “मी त्यांना (घोष) सांगायचं ठरवलं होतं की, एकतर तो आपल्यासोबत राहण्यासाठी येईल किंवा मी त्याच्यासोबत राहण्यासाठी जाईन,” असा खुलासा त्यांनी केला.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात श्रींजयचे दोन मित्र सोमवारी रात्री त्याला भेटायला आले होते असं उघड झालं आहे. यामधील एक त्याची प्रेयसी होती, जिच्यासोबत तो लवकरच लग्न करणार होता. 

घोष यांनी श्रींजय फार हुशार होता आणि आम्ही एकमेकांना चांगले ओळखू लागलो होतो असं सांगितलं आहे. “हे माझं दुर्देव आहे. मी फार कमनशिबी आहे. मला मूल असल्याचा आनंद कधीच अनुभवता आला नाही. पण आता तो गेल्याचा शोक व्यक्त करत आहे. श्रींजय माझ्या फार जवळ होता,” असा ते म्हणाले आहेत.

भाजपाचे माजी खासदार आणि बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी 18 एप्रिल रोजी भाजपच्या महिला शाखेत असलेल्या रिंकू मजुमदार यांच्याशी लग्न केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *