अर्घ्य देण्यासाठी आवश्यक वस्तू – चांदीचे भांडे, दूध, तांदूळ.
अर्घ्य असे अर्पण करा –
चांदीच्या कलशात दूध भरून, त्यात तांदूळ टाका. चंद्र देवाकडे तोंड करून उभे रहा. एक मोठे ताट जमिनीवर ठेवा आणि त्यानंतर ऊँ सों सोमाय नम: या मंत्राचा उच्चार करत दोन्ही हात वर करून कलशातून चंद्राला अर्घ्य अर्पण करा. भांड्यातून दुधाचा प्रवाह ताटात सोडा. अर्घ्य दिल्यानंतर ते दूध दान करू शकता.
दूध नसेल तर चंद्राला जल अर्पण करावे. जर तुमच्याकडे चांदीचे भांडे नसेल तर तुम्ही मातीच्या भांड्यात अर्घ्य देऊ शकता.