Baba Vanga Horoscope 2025 : अंध महिला जिने जागतिक, राजकीय आणि येणाऱ्या संकटाबद्दल भाकीत केलं आणि तिचे ही भविष्यवाणी जगभरात प्रसिद्ध झाली. शिवाय तिच्या या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. या महिलेचे नाव बाबा वेंगा असून 9/11 चा दहशतवादी हल्ला, राजकुमारी डायना यांचा मृत्यू, चेर्नोबिल आपत्ती आणि ब्रेक्झिट सारख्या भविष्यवाणी तिच्या तंतोतंत खऱ्या ठरल्यात. अशात नवीन वर्ष संपयला अवघे काही दिवस बाकी असताना 2025 बद्दलही काही भाकीत केलंय. त्यासोबत येणारं नवीन वर्ष 2025 हे कोणत्या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार हे सांगितलंय. बाबा वेंगा यांच्या भाकीतनुसार 5 राशींचे लोक गडगंज श्रीमंत होतात.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष परिवर्तनकारी असणार आहे. नवीन वर्ष संपत्तीत वाढ आणि विपुलतेने भरलेलं ठरणार आहे. नवीन वर्षात तुम्ही चमकणार आहात. अडथळ्यांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. त्यासोबत अतुलनीय यशापर्यंत तुम्ही मजल मारणार आहे. नवीन वर्षात वैश्विक आशीर्वाद प्राप्त करणारी मेष ही पहिली रास असणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला पावलो पावली मिळणार आहे. आर्थिक संधी तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे.
वृषभ रास
नवीन वर्ष 2025 हे या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा असणार आहे. आजपर्यंत केलेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नवीन वर्षात मिळणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही नवीन वर्षात स्थिर होणार आहात. त्यासोबत तुम्ही नवीन वर्षात ठोस गुंतवणूक करणार आहे, ज्यासाठी सुवर्ण संधी तुम्हाला चालून येणार आहे. व्यावसायिकांसाठीही नवीन वर्ष उत्तम सिद्ध होणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळणार असून त्यातून लाभ होणार आहे.
मिथुन रास
या राशीसाठी 2025 हे वर्ष अनेक सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. तुमची तीक्ष्ण बुद्धा तुम्हाला नवीन वर्षात आव्हानांवर मात करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पैशांबद्दल बोलायचं झालं तर आर्थिक स्थिरता तुम्हाला मिळणार आहे. वैयक्तिक वाढीचा मार्गही नवीन वर्षात मोकळा होईल. तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवून धाडसी निर्णय घेतल्यास लाभच लाभ होईल.
कर्क रास
या राशीच्या लोकांसाठी 2025 येणारं नवीन वर्ष अनपेक्षित संधी आणि लाभांनी भरलेला आहे. भूतकाळातील आणि वर्तमान प्रयत्नांसाठी तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे. नवीन वर्षात अशी ग्रह स्थिती निर्माण होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टींना तुम्ही स्वत:कडे आकर्षित करु शकणार आहात. त्यासोबत यश तुमच्या दारात चालून येणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात भरभराटी होणार आहे.
कुंभ रास
बाबा वंगा यांच्या नुसार 2025 हे वर्ष कुंभ राशीसाठी भाग्यशाली सिद्ध होणार आहे. त्यांच्यासाठी नवीन वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. शनीच्या मजबूत प्रभावाने मार्गदर्शनातून तुमच्या उर्जैत वाढणार आहे. त्यामुळे धाडसी उद्दिष्टे साध्य नवीन वर्षात यशस्वी होणार आहात. ब्रह्मांड तुम्हाला तुमची पूर्ण क्षमतेचे वरदान देणार आहे. तुमच्या करिअरचा आलेख वाढता असणार असून सर्व बाजूने तुम्हाला मदत मिळणार आहे.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)