Panchang 18 December 2024 in Marathi : आज मार्गशीर्ष महिन्यातील आणि या 2024 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. या चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थी गणेशाला समर्पित आहे. पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 डिसेंबरला सकाळी 10:06 वाजता सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 डिसेंबरला सकाळी 10:02 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार 18 डिसेंबर रोजी अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत केलं जाणार आहे. त्याच वेळी, चंद्रोदयाची वेळ रात्री 09:03 आहे. यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. (wednesday Panchang )
पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून आज लक्ष्मी योगासोबतच ऐंद्र योग आणि पुष्य नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. चंद्र कर्क राशीत आहे.
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. बुधवार हा दिवस गणशेला समर्पित आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (wednesday panchang 18 december 2024 panchang in marathi margashirsha 2024 akhuratha sankashti chaturthi 2024 )
पंचांग खास मराठीत! (18 December 2024 panchang marathi)
वार – बुधवार
तिथी – तृतीया – 10:08:36 पर्यंत
नक्षत्र – पुष्य – 24:59:05 पर्यंत
करण – विष्टि – 10:08:36 पर्यंत, भाव – 22:00:59 पर्यंत
पक्ष – कृष्ण
योग – इंद्रा – 19:33:04 पर्यंत
सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय – 07:08:17
सूर्यास्त – 17:27:39
चंद्र रास – कर्क
चंद्रोदय – 20:26:59
चंद्रास्त – 09:50:59
ऋतु – हेमंत
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत – 1946 क्रोधी
विक्रम संवत – 2081
दिवसाची वेळ – 10:19:21
महिना अमंत – मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत – पौष
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त – 11:57:19 पासुन 12:38:36 पर्यंत
कुलिक – 11:57:19 पासुन 12:38:36 पर्यंत
कंटक – 16:05:04 पासुन 16:46:21 पर्यंत
राहु काळ – 12:17:57 पासुन 13:35:23 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:49:34 पासुन 08:30:51 पर्यंत
यमघण्ट – 09:12:09 पासुन 09:53:26 पर्यंत
यमगण्ड – 08:25:42 पासुन 09:43:07 पर्यंत
गुलिक काळ – 11:00:32 पासुन 12:17:57 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत – नाही
दिशा शूळ
उत्तर
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)