Swapna Shastra : दिवसभरात कामामुळे थकव्यानंतर जेव्हा आपण रात्री गाढ झोपतो तेव्हा आपल्याला स्वप्न पडतात. स्वप्न पडणे ही खूप सर्वसामान्य बाब आहे. वैज्ञानिकदृष्टीकोनातून दिवसभरात आपण केलेल्या गोष्टी, विचार हे सगळे आपल्या डोक्यात कुठेतरी फिरत असतात. याच गोष्टी रात्री झोपल्यानंतर स्वप्नाच्या रुपात आपल्याला दिसतात. पण स्वप्न शास्त्रानुसार आपल्याला पडणारे स्वप्न हे आपल्या आयुष्यातील येणाऱ्या घटनांचे संकेत असतात. काही स्वप्न हे शुभ तर काही अशुभ घटनांचे संकेत देतात असं शास्त्रात सांगण्यात आलंय. शास्त्रात सांगण्यात आलंय की, जर शुभ असो किंवा अशुभ तुम्ही ही स्वप्न बायकोला सांगितल्यास तुमच्या आयुष्यात त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशी कोणते शुभ स्वप्न आहेत जे बायको काय कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा वाईट परिणाम आयुष्यावर होतो.
स्वतःच्या मृत्यूचे दर्शन
स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहिला असेल तर हे स्वप्न शुभ मानले गेले आहे. स्वप्न शास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुमच्या आयुष्यात लवकरच आनंद येणार आहे. तुमच्या काही जुन्या इच्छा पूर्ण होणार आहेत. जर आपण असे स्वप्न इतर कोणाला सांगितलं तर असा विश्वास आहे की ते नकारात्मक गोष्टींना आकर्षित करतो.
पालकांना पाणी देणे
स्वप्नात पालकांना पाणी पाजताना दिसल्यास हे खूप शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुमची लवकरच प्रगती होणार आहे. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला उंच उडी मारणार आहात. आयुष्यातील अडथळे संपणार आहेत. अशा स्थितीत हे स्वप्न कोणाला सांगितल्यास उलट घडू शकतं. म्हणजे करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात.
चांदीने भरलेला कलश
चांदीने भरलेला कलश जर तुम्हाला स्वप्नात चांदीने भरलेले कलश दिसले तर असे स्वप्न शुभ मानले जाते. याचा अर्थ लवकरच तुम्हाला आर्थिक संकटातून सुटका मिळेल. घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होईल. तुम्हाला अचानक पैसे मिळतील, ज्यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. हे स्वप्न इतर कोणाला सांगून फायदा नाही. आई लक्ष्मी परत जाते.
स्वप्नात देव दिसणे
जर तुम्हाला स्वप्नात देव दिसत असेल तर हे स्वप्न शुभ समजले जाते. याचा अर्थ तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. यामुळे तुमचे नशीब उजळेल. जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)