आयुष्यात ‘या’ गोष्टी सापडणे म्हणजे भाग्यशाली असण्याची निशाणी


Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे विद्वान असल्याच्या नोंदी सापडतात. आचार्य चाणक्य यांना कुशाग्र बुद्धीमत्ता आणि ज्ञानासाठी आजही ओळखले जातात. मौर्य साम्राज्याच्या जडण-घडणीत चाणक्यांचे मोलाचे योगदान आहे. आचार्य चाणक्य यांचे विचार आजच्या घडीलाही खूप योग्य असतात. आचार्य चाणक्य यांनी अनेक विषयांवर त्यांची मत दिली आहेत. आचार्य चाणक्य यांना एक कुशल रणनीतिकार आणि महान अर्थशास्त्री म्हणूनही मानले जाते. 

चाणक्य निती समाजकारणाबरोबरच राजकारणाबाबतही अनेक गोष्टींवर मत व्यक्त केले आहेत. चाणक्य नितीच्या गुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकानुसार

भोज्यं भोजनशक्तिश्च रतिशक्तिर वरांगना। 
विभवो दानशक्तिश्च नाऽल्पस्य तपसः फलम्॥

श्लोकाचा अर्थ काय

या श्लोकानुसार ज्या व्यक्तीकडे जेवण आहे आणि ते पचवण्याची शक्ती आहे आणि ज्याची पत्नी खंबीर आहे हे तपस्येचे फळ आहे. पुढे आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीकडे वैभव आणि ऐश्वर्य आहे त्यातबरोबर दान-पुण्य करण्याचे समार्थ्य आहे हे सर्वदेखील एका तपस्येचे फळ आले. असं मागील जन्माच्या कर्मामुळं होतं आणि या सर्व गोष्टीमुळं मनुष्य भाग्यशाली बनतो.

चाणक्य नितीनुसार, कोणताच व्यक्ती कष्ट केल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. भाग्यशाली होणे हे एखाद्या तपस्येपेक्षा कमी नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे जेवणाची कमतरता असेल तर त्याला जेवण पचवण्यास कोणतीही अडचणी येत नाही. असा व्यक्ती आयुष्यात नेहमी सुखी राहतो. 

जर तुम्हाला आयुष्यात चांगल्या जोडीदाराची साथ मिळाली तर तुमचे पुढील आयुष्य आनंदी राहते. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन आनंदी असेल आणि पत्नी सद्गुणी असेल तर अशी व्यक्ती खूप भाग्यवान असते.

चाणक्य नीतिमध्ये असे म्हटले आहे की, भाग्यवान व्यक्तीला संपत्तीची कमतरता नसते. अनेकदा असे दिसून येते की पैसे असूनही, अनेक लोकांमध्ये दान करण्याची इच्छाशक्ती नसते. पैसे असणे आणि देणगी देण्याची इच्छा असणे हे सौभाग्याचे लक्षण आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *