Shani Budh Yuti 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, कर्मदाता आणि ग्रहांचा राजकुमार यांचा आज (3 एप्रिलला) संयोग झाला आहे. बुद्धिमत्ता, वाणी, तर्क, आणि प्रयत्नचा कारक बुध यांचा पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्रात कर्मदाता आणि न्यायदेवता शनिदेव आधीपासून विराजमान आहे. त्यामुळे पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनिदेव आणि बुध ग्रहांचं अद्भूत संयोग काही राशींच्या आयुष्यात गोल्डन टाइम घेऊन आला आहे. या संयोगाचा तीन राशीच्या लोकांना अंत्यत सकारात्मक परिणाम होणार आहे. या लोकांच्या आयुष्यात पैसाच पैसा येणार आहे. कोणत्या आहेत या राशी चला जाणून घेऊयात. (Shani Budh Yuti 2025 After 30 years the alliance of Mercury and Saturn Golden time starts from 3 April you will get a lot of money)
वृषभ रास
या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत राहणार आहे. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. याशिवाय, हा काळ गुंतवणुकीसाठीही शुभ राहणार आहे. व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये मोठा नफा होणार आहे. या काळात व्यवसाय वाढवण्याची चांगली संधी मिळणार आहे. परदेश प्रवासाचे योग राहणार आहे. मित्रांच्या मदतीने तुम्हाला चांगली नोकरी मिळणार आहे.
मिथुन रास
या राशीच्या लोकांना बुध आणि शनिदेव यांच्या संयोगामुळे आयुष्यात आनंदाचा प्रवेश होणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहणार आहे. व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला भरपूर नफा प्राप्त होणार आहे. याशिवाय, बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी नांदणार आहे. जमिनीशी संबंधित कामात आर्थिक लाभ मिळणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेत वाढ होणार आहे.
तूळ रास
शनिदेव आणि बुध संयोग तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. पगार वाढीसोबतच पदोन्नतीचीही दाट शक्यता आहे. या काळात तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश प्राप्त होणार आहे. प्रेम जीवनात तुमच्या जोडीदारासोबत तुमचे चांगले संबंध राहणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी रोमँटिक ट्रिपवर जाणार आहात. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास घडणार आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)