मणिकर्णिका घाटावर रोज का होतात 108 अंत्यसंस्कार? काय आहे त्या मागची मान्यता?

[ad_1]

Manikarnika Ghat 108 Funerals : वाराणसी म्हणजेच काशी ही मोक्षाची नगरी म्हणून ओळखली जाते. इथल्या प्रत्येक गल्ली, मंदिर आणि इथे असलेल्या प्रत्येक घाटामागे एखादी पौराणिक कथा किंवा श्रद्धेची कहाणी लपलेली असते. असाच एक घाट म्हणजे मणिकर्णिका घाट. जगातील सर्वात प्राचीन घाटांपैकी एक मानला जाणारा हा घाट मृतांच्या अंतिम संस्कारासाठी सर्वात पवित्र स्थळ मानलं जातं. इथे दिवस रात्र अंत्यविधी होतात. असं म्हटलं जातं की रोज किमान 108 मृतदेहांचं अंतिम संस्कार इथे केलं जातं. कधी ही संख्या 300, 400 किंवा 600 पर्यंतही पोहोचते, पण ही संख्या कधी 108 पेक्षा कधीच कमी नसते. 

याविषयी माहिती भोपाळचे रहिवाशी असलेल्या ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. या घाटाची मान्यता ही आहे की भगवान शंकर आणि माता पार्वती हे इथे आले होते. इथे माता पार्वती यांचं कर्णफूल म्हणजे (कानातलं) जमिनीवर पडलं होतं आणि त्यामुळेच या घाटाचं नाव मणिकर्णिका पडलं. तर लोकांची मान्यता आहे की जे काही ज्या लोकांच्या पार्थीवावर अंत्यविधी इथे होतो त्यांना मोक्ष म्हणजेच पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका मिळते. 

पण रोज 108 चिता का? यामागे धर्म आणि ज्योतिषशास्त्रात एक विशेष अर्थ आहे.

हिंदू धर्मात 108 ही संख्या पूर्णत्वाचं प्रतीक मानली जाते. जपमाळेतही 108 मणी असतात. योगशास्त्रात शरीरात 108 ऊर्जा केंद्रे (नाड्या) असल्याचं सांगितलं जातं. ग्रह-ताऱ्यांचं अंतर, कालचक्र आणि आध्यात्मिक शक्तींचंही 108 शी नातं जोडलेलं आहे. म्हणून असं मानलं जातं की या घाटावर दररोज 108 चिता जळणं, ही एक प्रकारची आध्यात्मिक समतोलता राखण्यासाठी आवश्यक असते. काही लोक तर म्हणतात की इथे काही अदृश्य शक्ती आहेत ज्या ही संख्या कायम राखतात. 

हे केवळ योगायोग आहे का?

ज्यांनी मृत्यूला जवळून पाहिलं आहे, त्यांना वाटतं की मणिकर्णिका घाट हा मृत्यूचा शेवटचा टप्पा नाही, तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. रोज शेकडो लोक इथे आपल्या जवळच्यांचा अंतिम संस्कार करायला येतात. तरीही या घाटावर शांतता राहते. जणू काही तिथे एक अदृश्य अशी शक्ती आहे जी सगळं काही सांभाळून घेते.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *