India Pakistan War All About Pakistan Kundli Prediction India Pakistan tension Operation Sindoor

[ad_1]

All About Pakistan kundli Prediction: भारताच्या ऑपरेशन सिंदूर मुळे पाकिस्तानची भांबेरी उडाली आहे. पाकिस्तानने हल्ले करताचा भारत जबरदस्त पलटवार करत आहे. अशातच आता पाकिस्तानच्या कुंडलीत ग्रहांची दिशा फिरली आहे. पाकिस्तानच्या कुंडलीत  भयानक विनाशकारी योग आला आहे. नीच शुक्र, शनी आणि सूर्याची महादशा पाकिस्तानला पूर्णपे बर्बाद करणार आहे. जाणून घेऊया पाकिस्तानच्या कुंडलीत नेमकं आहे तरी काय?

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानच्या भारताविरोधातील कुरापती सुरुच आहेत. भारताने सीमेवर पाकिस्तानचे अनेक ड्रोन आणि लढाऊ विमाने पाडली. पाकिस्तान अजूनही सीमेपलीकडून भारतावर हल्ले करत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची परिस्थिती पाहून लोकांना पाकिस्तानची कुंडली काय सांगते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालीवरून भविष्याचा अंदाज लावला जातो. अशा परिस्थितीत, पाकिस्तानची कुंडली काय सांगते ते जाणून घेऊया.

पाकिस्तानची कुंडलीत मेष राशी आहे.  सध्या शुक्र मारकेशच्या भूमिकेत आहे. सध्या शुक्र ग्रहाची महादशा सुरू आहे. ज्याच्या दुष्परिणामांमुळे पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे.  पाकिस्तानच्या कुंडलीत असलेली शुक्र ग्रहाची ही महादशा बराच काळ चालू राहील, ज्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी दयनीय होईल. सध्या, बुध ग्रहाची अंतरदशा शुक्राच्या महादशासोबत प्रभावी आहे. बुध ग्रह सध्या चंद्राच्या राशीत स्थित आहे. शुक्र आणि शनीच्या प्रभावाखाली अडकला आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत आहे. शुक्र आणि बुध ग्रहाची ही स्थिती पाकिस्तानला गंभीर संकटाकडे अडकवत आहे.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, पाकिस्तानच्या कुंडलीत सूर्याच्या महादशासोबत केतूची अंतरदशा देखील सुरु आहे. केतूची अंतर्दशा 4 मे 2025 पर्यंत प्रभावी होती.  परंतु याचा प्रभाव पुढील 30 दिवसांपर्यंत राहील. यानंतर शुक्राची अंतर्दशा सुरू होईल.
पाकिस्तानच्या नवमांश कुंडलीमध्ये, सूर्य बाराव्या स्थानावर आहे. याचा मोठा प्रभाव पाकिस्तानवर होणार आहे. तर दुसरीकडे दहाव्या कुंडलीत केतू आणि मंगळाच्या युतीमुळे ग्रहण दोष निर्माण होत आहे, ज्याचा प्रतिकूल परिणाम सिंधू पाणी करारासारख्या करारांवर देखील दिसून येतो.

पाकिस्तानच्या रुद्रांश कुंडलीत शुक्र नीच स्थानावर आहे, तर चतुर्थांश कुंडलीत केतू बाराव्या स्थानावर आहे. जो अत्यंत अशुभ मानला जातो. यावरून असे दिसून येते की पाकिस्तानच्या भूमीवरील आणि अस्तित्वावरील संकट अधिकच गहिरे होत चालले आहे.  हळूहळू पाकिस्तानचे  अस्तित्वच धोक्यात आले आहे.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *