Top 10 Medical Courses: बारावीनंतर हे कोर्स केले तर लोखोंमध्ये होईल कमाई


 मेडिकल क्षेत्र हे नेहमीच स्थिर आणि भरभराटीला असलेले क्षेत्र आहे. पण काही वेळा या परीक्षा देणे मुलांना शक्य नसते किंवा काही विशेष करावं अशी मुलांची इच्छा असते. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचे नसेल तरीही अनेक वैद्यकीय कोर्सेस उपलब्ध आहेत. यामध्ये करिअर करण्याच्या खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आत्ताच जाणून घ्या भारतातील टॉप 10 मेडिकल कोर्सेस.

1. MBBS (बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बैचलर ऑफ सर्जरी)  

डॉक्टर होण्यासाठी MBBS हा सर्वोत्तम आणि सर्वाधिक लोकप्रिय कोर्स आहे. याची कालावधी साडेपाच वर्षे असते, ज्यात 1 वर्षाची इंटर्नशिप करणे खूप गरजेचे आहे.  

2. MS (मास्टर ऑफ सर्जरी)  

हा एक पोस्ट-ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे. सर्जिकल ट्रेनिंग आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी MS हा उत्तम पर्याय आहे. याची कालावधी 3 वर्षे असते.  

3. MD (डॉक्टर ऑफ मेडिसिन)  

हे सुद्धा एक पोस्ट-ग्रॅज्युएट मेडिकल कोर्स आहे. हा वेगवेगळ्या किंवा ठराविक वैद्यकीय शाखांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी केला जातो. MD पूर्ण करण्यासाठी 3 वर्षे लागतात.  

4. BAMS (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी)  

हा कोर्स आयुर्वेदिक उपचार पद्धती शिकवण्यासाठी डिझाइन केला आहे. याचा कालावधी साडे पाच वर्षे असते.  

5. BHMS (बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी)  

होमिओपॅथीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उत्तम पर्याय आहे. याचा कालावधी साडे पाच वर्षे असते.  

6. BPT (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी)  

फिजिओथेरपी म्हणजे शरीरातील स्नायू आणि हाडांचे उपचार करण्याची प्रक्रिया. या कोर्सचा कालावधी 4 वर्षे आहे.  

7. BVSc (बॅचलर ऑफ व्हेटरिनरी सायन्स)  

जर तुम्हाला प्राण्यांचे डॉक्टर (व्हेटरनरी डॉक्टर) व्हायचे असेल, तर हा कोर्स उत्तम पर्याय आहे. आजकाल अनेक लोक प्राणी पळतात. मग अशा वेळी प्राण्यांच्या डॉक्टरांना खूप मागणी आहे. या कोर्सचा कालावधी 5 वर्षे असते.  

8. BSMS (बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन अँड सर्जरी)  

सिद्ध उपचार पद्धतीमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी हा कोर्स केला जातो. हा अभ्यासक्रम आयुष मंत्रालयाने आयोजित केला आहे. या कोर्सचा कालावधीदेखील साडे पाच वर्षे असते.  

9. BUMS (बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी)  

युनानी चिकित्सा प्रणाली शिकण्यासाठी हा अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. याची कालावधी साडेपाच वर्षे इतकी असते.  

10. BNYS (बॅचलर ऑफ नॅच्युरोपॅथी अँड योगा सायन्स)  

प्राकृतिक उपचार आणि योगशास्त्र शिकण्यासाठी BNYS हा कोर्स केला जातो. आजकाल अनेक माहामाऱ्याचा कहर वाढत असताना लोक आयुर्वेद आणि योगाकडे वळत आहेत, मग अशा वेळी हा कोर्स करणे मुलांसाठी खूप फायदेशीर ठरेल. याचा कालावधी साडे चार वर्षे आहे.

वरील कोणत्याही मेडिकल कोर्सद्वारे तुम्ही सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता किंवा स्वतःचा क्लिनिक सुरू करू शकता. योग्य कोर्स निवडून तुम्ही मेडिकल क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकता.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *