बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच नातं काही कोणाशी लपून राहीलेलं नाही. ८० च्या दशकात दाऊद इब्राहिमच्या दुबईच्या पार्ट्यांमध्ये बॉलिवूड कलाकारांची हजेरी असो, अभिनेत्रींचे अंडरवर्ल्ड डॉनसोबत प्रेमसंबंध असो किंवा खंडणी आणि हिंदी चित्रपटांमध्ये गुंतवलेला कळा पैसा मात्र या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे डी गँग. होय बॉलिवूडच्या सगळ्या काळ्या कामांमध्ये डी गँगचेच वर्चस्व होतो. दाऊदचे विरोधी म्हणजेच छोटा राजन , गवळी यासारख्या लोकांनी बॉलिवूडला बिझनेस म्हणून पाहिलं होतं असं फारसं ऐकण्यात आलं नाही. मात्र हे तितकं खरं नाही. पण एक सिनेमा असा होता जो छोटा राजनच्या जीवनावर आधारित होता.