कोणते कलाकार दिसणार?
महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘ मुक्काम पोस्ट देवाचं घर ‘ या चित्रपटात मायराच्या वाट्याला आलेली भूमिका काय आहे ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहाता चाहते मायराच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.