गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली चर्चेत आहे. कारण, त्याचा प्रत्येक सिनेमा हा हिट होताना दिसत आहे. त्यामध्ये जवान, उस्ताद भगत सिंग, थेरी, मार्शल अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आता अटीलाच आणखी एक बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याचे नाव ‘बेबी जॉन’ असे आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अटली आणि त्यांची संपूर्ण टीम सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, अटलीने त्याचे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरण्यामागचे कारण देखील सांगितले आहे.