गेल्या काही दिवसांपासून ‘मुफासा द लायन किंग’ या अॅनिमेटेड सिनेमाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि त्यांची दोन्ही मुले अबराम व आर्यन यांनी आवाज दिला आहे. एकंदरीत हा चित्रपट पाहिल्यानंतर या सिनेमासाठी खान कुटुंबीयांची निवड ही योग्य ठरल्याचे तुम्हाला जाणवेल. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या लायन किंग सिनेमाचा हा प्रिकवल आहे. ‘मुफासा द लायन किंग’ या चित्रपटात एक हरवलेला छावा आपल्या आई-वडिलांच्या शोधात असतो. पण त्यांच्या शोधात असताना तो एका दूरच्या राज्यावर राज्य करु लागतो.