Pushpa 2 BO Collection Day 18 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ द रूल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात अल्लू आणि रश्मिका मंदानाची जोडी पुन्हा एकदा चांगलीच पसंत केली जात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रविवारी या चित्रपटाने इतिहास रचला. अल्लूचा हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या १८व्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटाने आतापर्यंत किती बिझनेस केला आहे…