Varun Dhawan: बॉलिवूड अभिनेता वरूण धवन सध्या चर्चेत आहे. त्याचा ‘बेबी जॉन’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अटली आणि कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. या प्रमोशन दरम्यान वरूण धवनने खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे. त्याने त्याच्या आयुष्यात एक घटना अशी घडली की जवळपास दोन वर्षे ब्रेक घ्यावा लागला होता असे देखील सांगितले. या घटनेनंतर वरूण धवनने भगवद्गीता आणि रामायण वाचायला सुरुवात केली होती. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया…