Shyam Benegal Death: ‘समांतर’ सिनेमाचे जनक, प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे २३ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. श्याम बेनेगल हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना किडनीशी संबंधीत आजार झाला होता. आज, वयाच्या ९०व्या वर्षी श्याम बेनेगल यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. श्याम बेनेगल यांच्या निधनाच्या वृत्ताला मुलीने दुजोरा दिला आहे.