‘ए मामू’ म्हणत प्रेक्षकांची मने जिंकणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे संजय दत्त. तो नेहमीच त्याच्या चित्रपटांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. संजय दत्तने आतापर्यंत तीन लग्न केले. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर संजय दत्त पूर्णपणे खचून गेला होता. त्याने रिया पिल्लईशी दुसरे लग्ने केले. पण मुंबई बॉम्बस्फोटात संजय दत्तचे नाव आल्यामुळे त्याला अटक झाली. त्यानंतर संजय दत्त आणि रिया यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. आता रिया नेमकी कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया रियाविषयी…