भारताची पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिला 11 नोव्हेंबर 2024 ला कन्यारत्न झालंय. साक्षीने 25 नोव्हेंबर 2024 च्या रात्री इन्स्टाग्रामवर चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. तिने मुलीचं नाव योशिदा कादियान ठेवलंय. साक्षीने 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि 13 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेती साक्षी तिच्या फिटनेस, जिद्द आणि दृढनिश्चयासाठी ओळखली जाते.
साक्षीने बुधवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या ती गर्भवती असून जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती 9 महिने गर्भवती असूनही स्क्वॅट्स आणि लंग्ज करत असताना 15-किलो बार्बल्सपासून ते डंबलेसपर्यंत वजन उचलताना दिसत आहे. साक्षीने स्वत: सांगितलं की, मुलीच्या जन्माच्या आठवड्याभरापूर्वी तिने हा वर्कआऊट केला होता.
हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, Fit is not destination. It’s a way of life. साक्षीने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून पुढच्या क्षणाला प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. कमेंट बॉक्समध्ये तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. एका यूजर्सने म्हटलं की, हीच महिला शक्ती आहे. खूप शक्तिशाली साक्षी. एकाने लिहिलंय, ‘हॅट्स ऑफ टू यू’, दुसऱ्या युजर्सने लिहिलंय की, बऱ्याच लोकांसाठी प्रेरणा’.
खरंच साक्षीचा हा व्हिडीओ प्रत्येकीसाठी प्रेरणादायी आहे. व्यायाम हा कुठल्याही वयात आणि गर्भवस्थेतेही करतो. फक्त गर्भवस्थेत असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि जिममध्ये टेनरचा देखरेखाखाली करावं. गर्भवती महिलांनी योगा आणि जिम करणाचा सल्ला अनेक वेळा आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून दिला जातो.
अलीकडेच साक्षी मलिकची बायोग्राफी ‘साक्षी’ लाँच करण्यात आलंय. पुस्तकात साक्षी मलिकने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलंत. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनल्याचे पुस्तकात लिहिलंय. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना आणि कुटुंबातील सदस्यांना राज्य संघटनांमध्ये स्थान दिलंय.