आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ABC ज्यूस रोज सकाळी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच त्वचा आणि केस निरोगी राहतात. सफरचंदातील फायबर, बीटमधील लोह आणि गाजरातील बेटा-कॅरोटीन एकत्र येऊन शरीराला संपूर्ण पोषण देतात.
ABC ज्यूसचे महत्त्व:
1.पचन सुधारते: या ज्यूसमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारते व गॅस, अपचन यासारख्या समस्यांवर मात होते.
2.रक्तशुद्धी: बीटमध्ये भरपूर लोह असल्याने रक्तशुद्धी होते आणि हिमोग्लोबिन वाढते.
3. त्वचेसाठी उत्तम: गाजर आणि सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तजेलदार ठेवतात व सुरकुत्यांवर मात करतात.
4. ऊर्जा वाढवते: नैसर्गिक साखर आणि पोषकद्रव्यांमुळे थकवा कमी होऊन ऊर्जा मिळते.
5. हृदयासाठी फायदेशीर: सफरचंदातील फायबर व गाजरातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदय निरोगी ठेवतात.
6. डिटॉक्सिफिकेशन: शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी ABC ज्यूस अतिशय उपयुक्त आहे.
7. डोळ्यांसाठी लाभदायक: गाजरातील बेटा-कॅरोटीन दृष्टी सुधारते आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
ज्यूस कसा बनवावा?
1. सफरचंद, बीट आणि गाजर धुवून छोटे तुकडे करा.
2. मिक्सरमध्ये वाटून गाळून घ्या किंवा फायबरसाठी तसेच प्या.
3. चवीनुसार लिंबाचा रस घालून ताज्या स्वरूपात सर्व्ह करा.
आरोग्य तज्ज्ञांचे मत:
तज्ज्ञांच्या मते, हा ज्यूस नैसर्गिक पोषणाचा उत्तम स्रोत आहे. सकाळच्या वेळी नियमितपणे हा ज्यूस घेतल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि दीर्घकालीन आजारांपासून बचाव होतो.
आरोग्यप्रेमींसाठी ABC ज्यूस हा नवा मंत्र ठरत असून, साध्या पद्धतीने तयार होणारा हा ज्यूस तुमच्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग बनू शकतो
महत्त्वाचे टिप्स:
ताज्या भाज्या आणि फळांचा वापर करा.
सकाळच्या वेळेस हा ज्यूस घेतल्यास जास्त लाभ होतो.
नियमित सेवनाने दीर्घकालीन फायदे मिळू शकतात.
ABC ज्यूस हा नैसर्गिक पोषण आणि आरोग्यासाठी उत्तम उपाय आहे. रोजचा आहार संतुलित करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी हा ज्यूस आवर्जून प्या.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)