Actor Ranbir Kapoor Suffers From This Health Issue: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता रणबीर कपूरने ‘डेविएटेड नेसल सेप्टम’चा (Deviated Nasal Septum) त्रास असल्याचं सांगितलं आहे. मराठीमध्ये याला विचलित अनुनासिका असं म्हणतात. ‘डेविएटेड नेसल सेप्टम’ म्हणजे काय हे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर नाकाच्या दोन अनुनासिका म्हणजेच दोन छिद्रं एकमेकांपासून वेगळं करणारं जे कार्टिलेज (हाडही नाही आणि स्नायूही नाही) सरळ नसून वाकडं असणं. यालाच आपण बोली भाषेत नाकाचं हाड वाढणं असंही म्हणतो.
नेमका हा आजार काय?
‘डेविएटेड नेसल सेप्टम’मुळे आपल्या श्वास घेण्याची पद्धत आणि जेवणाच्या सवयींवर मोठा फरक पडल्याचा दावा रबणीरने केला आहे. या समस्येबरोबर आपण मागील अनेक वर्षांपासून जगत असल्याचं तो म्हणाला आहे. ‘मेयो क्लिनिक’ने दिलेल्या माहितीनुसार, नाकाच्या दोन पाकळ्या वेगळं करणारं कार्टिलेज हे प्रमाणापेक्षा अधिक वेडवाकडं असतं तेव्हा एक नाकपुडी छोटी आणि एक मोठी होते. त्यामुळेच एका नाकपुडीतून अधिक तर एकातून कमी हवा श्वास घेताना आत-बाहेर जाते. यामुळे खाण्याच्या आणि श्वासोच्छावासासंदर्भातील सवयी बदलतात. रणबीरनेही आपल्याला वेगात जेवण्याची सवय याच समस्येमुळे असल्याचं म्हटलं आहे.
काहींना जन्मत: ही समस्या असते
रणबीरला असलेली ‘डेविएटेड नेसल सेप्टम’ची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. काहींना एखादी इजा झाल्याने ही समस्या उद्भवते तर काहींना जन्मत: ही समस्या असते. ‘डेविएटेड नेसल सेप्टम’चा त्रास असलेल्या रणबीरसारख्या व्यक्तींना श्वासोश्वासास त्रास जाणवू शकतो. ‘डेविएटेड नेसल सेप्टम’चा त्रास अधिक वाढल्यास नाकपुडीमधून श्वास घेणे आणि सोडणे कठीण होऊ बसते. त्यामधून अधिक गुंतागुंत निर्माण होते.
समस्या अधिक गंभीर होऊ शकते
‘डेविएटेड नेसल सेप्टम’चा परिणाम श्वास घेण्याच्या क्रियेवर होतो. मायो क्लिनकुनार, ‘डेविएटेड नेसल सेप्टम’चा त्रास वाढल्यास नाकाची एक बाजू ब्लॉक झाल्याप्रमाणे बंद होऊ शकते. काहींना या त्रासामुळे नाकातून रक्त येण्याची समस्याही जाणवते. नाकातील स्नायू सुजल्याने ‘डेविएटेड नेसल सेप्टम’मुळे होणारं ब्लॉकेज अधिक गंभीर होऊ शकतं.
उपाय काय?
ही समस्या दूर करण्यासाठी औषधोपचार घ्यावे लागतात किंवा समस्या अधिक गंभीर झाल्यास थेट शस्क्रीयेद्वारे नाकातील हे वेडवाकडं झालेलं हाडाहून थोडं मऊ असलेलं कार्टिलेज सरळ करता येतं.
‘डेविएटेड नेसल सेप्टम’ची लक्षणं काय?
> नाकपुडी ब्लॉक झाल्यासारखं होणे
> नाकातून रक्त येणे
> चेहऱ्यावर स्थायू दुखावणे
> घोरण्याची समस्या
> श्वासांवर उगाच लक्ष केंद्रित करणे
> एका ठराविक बाजूने (उजवी कूस किंवा डावी कूस) झोपण्यास प्राधान्य देणे
डॉक्टरांना कधी भेटावे?
> नाक चोंदल्यासारखं वाटत असेल आणि सर्दीसंदर्भातील सारे उपाय करुन झाल्यानंतरही श्वास घेण्यात त्रास होत असेल तर डॉक्टरांना भेटावे.
> नाकातून वारंवार रक्त येत असेल तर डॉक्टरांची भेट घ्यावी.
> सायनसचा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांना भेटा.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)