हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दह्याचा गुणधर्म थंड असल्याचे सांगितलं जातं आणि त्यामुळं याचा वापर कमी प्रमाणात करतात. परंतु हे कितपत योग्य आहे? प्रसिद्ध आहारतज्ञ भावेश गुप्ता आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, हिवाळ्यात दही खाणं हे फायदेशीर ठरु शकते. कसं ते जाणून घेऊया.
आयुर्वेद तज्ञांनुसार, दह्याचे गुणधर्म उष्ण मानले जाते. हिवाळ्यात दह्याचे सेवन करणे हे आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे आहारतज्ञ भावेश गुप्ता सांगतात. हा एक ‘प्रोबायोटीक’ पदार्थ आहे जो पचनसंस्थेला मजबूत करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतो.
दहीचे फायदे
पचनक्रिया सुधारतो: दह्यात असलेले ‘प्रोबायोटीक्स’ पचनसंस्था निरोगी ठेवते. हे बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडीटीसारख्या समस्यांना कमी करते.
हाडे आणि दातांना मजबूत बनवते
दही खाल्याने शरीरातील कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डी यांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जेणेकरुन हाडे मजबूत होतात आणि ‘ऑस्टियोपोरोसीस’पासून संरक्षण करण्यास मदत होते.
हृदय आणि रक्तदाबासाठी फायदेशीर
दह्याचे नियमित सेवन केल्याने कॉलेस्ट्रोल नियंत्रित राहतो आणि रक्तदाब कमी करण्यास मदत होते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
वजन कमी करण्यास मदत
दह्यात जास्त प्रोटीन आणि कमी कॅलरी असतात जेणेकरुन भुक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
मानसिक स्वास्थ्यात सुधार
दह्यात असलेले चांगले बॅक्टेरीया तणाव आणि चिंतेसारख्या समस्यांवर मात करतात.
दही खाण्याची योग्य पद्धत
- दही मध किंवा गुळासोबत खा जेणेकरुन जास्त उर्जा मिळेल.
- थंड दही खाणं टाळा. सामान्य तापमानावर आणून दही खा. दही अति थंड असेल तर खावू नका.
- दमा, साइनस किंवा घशांचा त्रास असणाऱ्यांनी हिवाळ्यात दही खाणं टाळा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)