किशोरवयीन मुलांमधील कर्करोगाची 6 सुरुवातीची लक्षणे आणि ती टाळण्याचे उपाय


Cancer Signs in Teenagers: कर्करोगाचासंबंध बऱ्याचदा वृद्धापकाळाशी जोडला जातो, परंतु त्याचा परिणाम मुले आणि तरुण प्रौढांवरही होऊ शकतो. प्रभावी उपचार आणि चांगल्या परिणामासाठी लवकर निदान करणे महत्वाचे आहे. किशोरवयीन मुलांमधील कर्करोगाची सुरुवातीची सहा लक्षणे आणि ती टाळण्याचे उपाय समजून घेतल्यावर त्यावर आळा घालणे सहज शक्य होते. या 6 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, मॉली क्युलर ऑन्कोपॅथोलॉजिस्ट डॉ. कुंजल पटेल यांनी दिली आहे.  

विनाकारण वजन घटणे

कोणत्याही कारणाशिवाय मोठ्या प्रमाणात घटणारे वजन हे कर्करोगाचे सामान्य आणि सुरुवातीचे लक्षण आहे. जर एखाद्या लहान किंवा किशोरवयीन मुलाचे वजन आहार किंवा शारीरिक हालचालींमध्ये बदल न करता मोठ्या प्रमाणात वजन कमी होत असेल तर ती चिंतेची बाब आहे. कर्करोग आणि इतर आजार टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टाळण्यासाठी सूचना: संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करण्यास प्रोत्साहित करा. तुमच्या मुलाचा विकास आणि वजन यावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा.

सतत येणारा थकवा आणि अशक्तपणा

सक्रिय तरुणांमध्ये थकवा सामान्य असू शकतो, परंतु सतत आणि विनाकारण येणारा थकवा किंवा अशक्तपणा ज्यामध्ये विश्रांती घेऊनही फरक पडत नसेल तर तो कर्करोगाचे लक्षण असू , शकतो. याचबरोबर पॅलोर किंवा श्वासोच्छवासाचा त्रास ही लक्षणे देखील संभवतात
टाळण्यासाठी सूचना: आपला मुलगा पुरेशी विश्रांती घेत आहे, पौष्टिक आहार घेत आहे आणि हायड्रेटेड राहत आहे याची खात्री करा. जर सतत थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वारंवार होणारे संक्रमण

वारंवार किंवा असामान्य संक्रमण झालेल्या तरुणांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते, जे ल्युकेमिया किंवा इतर कर्करोगाचे लक्षण असू शकते. वारंवार येणारा ताप, संक्रमण आणि विनाकारण होणाऱ्या जखमा किंवा रक्तस्त्राव याकडे दुर्लक्ष करू नये.
टाळण्यासाठी सूचना: चांगल्या स्वच्छता पद्धतींचा वापर करण्यास, निरोगी आहार आणि नियमित लसीकरणास प्रोत्साहन द्या. नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास आजार लवकर समजण्यास मदत होऊ शकते.

गाठी किंवा सूज

मान, कंबर, ओटीपोट किंवा घसा यासारख्या भागात आलेली गाठ किंवा सूज ही कर्करोगाची असू शकते. बऱ्याचदा, ही लक्षणे वेदनारहित असतात आणि कालांतराने वाढू शकतात.
टाळण्यासाठी सूचना: कोणत्याही प्रकारची सूज किंवा गाठ आढळल्यास त्याबद्दल माहिती देण्याविषयी मुलांना सांगा. लवकर निदान करण्यासाठी डॉक्टरांकडून नियमित शारीरिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

सतत वेदना

सतत वेदना, विशेषतः हाडे किंवा सांध्यांमध्ये, ऑस्टिओसारकोमा सारख्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. जर एखाद्या मुलास सतत वेदना झाल्याची तक्रार असेल जी नेहमीच्या उपचारांसह जात नाही, तर त्याची अधिक तपासणी करणे आवश्यक आहे.
टाळण्यासाठी सूचना: सातत्याने होणाऱ्या वेदने बद्दल माहिती देण्याविषयी मुलांना सांगा नियमित वैद्यकीय तपासणी आणि तीव्र वेदनांकडे त्वरित लक्ष दिल्यास लवकर निदान होऊ शकते.

त्वचे मध्ये दिसून येणारे बदल

त्वचेतील बदल, जसे की नवीन तिळ, आधीपासून असलेल्या तिळामधील बदल किंवा असामान्य पुरळ, त्वचेच्या कर्करोगाची किंवा इतर कर्करोगाची चिन्हे असू शकतात. तिळाच्या आकारात किंवा रंगात होणारे कोणतेही बदल डॉक्टरद्वारे तपासून घ्यायला पाहिजेत.
टाळण्यासाठी सूचना : सनस्क्रीन वापरुन, संरक्षक कपडे घालून आणि कडकडीत उन्हात बाहेर पडणे टाळून आपल्या मुलाच्या त्वचेचे तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा. त्वचेत होणाऱ्या कोणत्याही बदलांसाठी तुमच्या मुलाची त्वचा नियमितपणे तपासा.
किशोरवयीन मुलांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता कमी आहे, परंतु प्रारंभिक चिन्हे आणि प्रतिबंधात्मक उपायांची जागरूकता महत्त्वपूर्ण आहे. नियमित वैद्यकीय तपासणी, निरोगी जीवनशैली आणि असामान्य लक्षणांकडे त्वरित लक्ष देणे लवकर निदान आणि उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण फरक करू शकते. जागरूक आणि सक्रिय राहून, पालक आपल्या मुलांना निरोगी आणि कर्करोगमुक्त जीवन जगण्यास मदत करू शकतात.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *