इंटरनेट Shocked! युट्यूबरने घटवले 114 किलो वजन; म्हणाला- ‘लोकांना मूर्ख बनवणं फार सोपं’


US Youtuber Nicholas Perry Lost 114 kg Weight : वाढतं वजन ही सध्या अनेकांसाठी एक मोठी समस्या आहे. प्रमाणाच्या बाहेर वजन वाढलं की शरीरात फॅट्स जमा होऊन अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळतं. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात, त्यात काहींना यश येत तर अनेकजण वजन कमी करण्यात अपयशी ठरतात. मात्र अमेरिकेतील एक असा युट्यूबर आहे ज्याने 2 वर्षात तब्बल 114 किलो वजन कमी केलं. या प्रसिद्ध युट्यूबरचं नाव निकोलस पेरी असून तो एक फूड व्लाॅगर आहे.

निकोलस पेरी हा युट्यूबवर खाण्यासंदर्भातील व्हिडीओ बनवायचा. तो शरीराने लठ्ठ असल्याने त्याचे वजन प्रचंड होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडीओ त्याच्या चॅनेलवर पोस्ट केला. यात तो पूर्वीपेक्षा खूप बारीक दिसत होता. त्याला पाहून त्याचे फॅन्स आश्चर्यचकित झाले. निकोलसने या व्हिडीओमध्ये आपण दोन वर्षात तब्बल 114 किलो वजन कमी केल्याचे म्हटले. याला त्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा सोशल मीडिया एक्सपेरिमेंट म्हटले. आश्चर्याची गोष्ट ही की, गेल्या दोन वर्षात निकोलसने त्याच्या अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो जाड दिसत होता. पेरीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये खुलासा केला की त्याने हे कसे केले आणि कशाप्रकारे त्याच्या फॅन्सना मूर्ख बनवले. 

व्हिडीओला आतापर्यंत 29 Million व्ह्यूज : 

प्रसिद्ध युट्यूबर निकोलस पेरी याला फॅन्स ‘निकोकाडो अवाकाडो’ म्हणूनही ओळखतात. निकोलस पेरीचे युट्यूबवर तब्बल 4.11 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या ट्रान्सफॉर्ममेशन व्हिडीओला आतापर्यंत 29 मिलियन लोकांनी पाहिलंय. या व्हिडीओत पेरीने वजन कमी केल्याबद्दल सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले.

हेही वाचा : हाय कोलेस्ट्रॉलवर रामबाण ठरू शकतात ‘या’ 5 भाज्या, 15 दिवस सेवन केल्यास निघून जातील नसांमधील फॅट्स

 

दोन वर्ष कोणालाही सांगितलं नाही : 

निकोलस पेरी हा त्याच्या व्हिडीओमध्ये एकावेळी भरपूर प्रमाणात खाण्यासाठी ओळखला जातो. पेरीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये खुलासा केला की त्याने दोन वर्ष गुप्तपणे 250 पाउंड म्हणजेच जवळपास 114 किलो वजन कमी केले. गुप्त यासाठी कारण तो या दरम्यान दोन वर्ष सोशल मीडियावर नियमित व्हिडीओ शेअर करत होता, ज्यात तो अतिशय लठ्ठ दिसला. त्यामुळे तो वजन कमी करतोय याबाबत लोकांना कोणतीही कल्पना नव्हती. पेरीने सांगितले की त्याने दोन वर्ष कोणतेही नवीन व्हिडीओ शूट केले नाहीत त्याने प्री रेकॉर्ड केलेले अतिरिक्त व्हिडीओ या दोन वर्षाच्या काळात पोस्ट केले. दोन वर्षांच्या कालावधीत आपण पूर्णपणे आरोग्याकडे लक्ष दिल्याचे पेरीने सांगितले. 

पेरीने फॅन्सना कसं मूर्ख बनवलं? 

‘टू स्टेप्स अहेड’ या व्हिडीओमध्ये युट्यूबर निकोलस पेरीने त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात प्री-रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओंद्वारे चाहत्यांना मूर्ख बनवल्याचे कबूल केले. व्हिडिओच्या सुरुवातीला पेरीने पांडाचे मुकुट घातले होते. तो यात म्हणाला, “मी नेहमी दोन पावले पुढे असतो”. पेरीने सांगितले की, त्याचे हे ट्रान्सफॉर्मशन अत्यंत व्यक्तिगत प्रक्रिया होती. त्याने याला ‘स्वतःच्या जीवनातील सर्वात मोठा सोशल मीडिया एक्सपेरिमेंट’ असे म्हंटले. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *