Eggs Healthy Diet: अंड हे खायलाही स्वादीष्ट असतं आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये महत्वाचे पोषक तत्व असतात. त्यामुळे अंड हा देशविदेशातही डाएटचा महत्वाचा भाग असतं. हेल्दी लाइफस्टाइल पाळणाऱ्यांच्या नाश्त्यामध्ये सकाळी अंड दिसतंच. सध्या अधिकांश लोक शाकाहारी बनतायत. त्यामुळे ते अंड्यासोबत सर्वच नॉन व्हेज खाणं बंद करतायत.पण अंड खाणं 1 महिन्यांसाठी सोडलं तर शरीरात काय बदल होतील माहिती आहेत का? याबद्दल विशेषत: अंडप्रेमींना माहिती असायला हवे.
अंड अचानक सोडल्यास येते पोषक तत्वांची कमी
जी माणसं खूप अंडी खातात आणि त्यांनी 1 महिना अंड खाणं बंद केलं तर काय होईल? शरीरावर त्याचा काय परिणाम होईल? डाएटमधून अंड कमी केलात तर शरीरावर त्याचा परिणाम होतो. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसमध्ये माहिती देण्यात आली आहे. अंड खाणं अचानक बंद केलात तर शरीरात पोषक तत्वांची कमी येते. अंड्यामध्ये प्रोटीन, अमिनो अॅसिड, विटामिन (बी 12, डी आणि कोलीन) आणि आयर्न( सेलिनियम आणि फॉस्फरस) चांगल्या प्रमाणात मिळते.
जेवल्यानंतरही नसाल संतुष्ट
मासंपेशींच्या देखभालीसाठी, आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंड्याची मदत होतेय अशावेळी जर कोणाला रोज अंड खाण्याची सवय असेल आणि त्याने अंड खाणं सोडलं तर पोटभर जेऊनही ती व्यक्ती संतुष्ट नसेल. कारण अंड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. अचानक अंड खाणं सोडल्यास कोलेस्ट्रॉल पातळीदेखील वरखाली होऊ शकते. अंड्यामध्ये डाएटचे समतोल राखणारे कॉलेस्ट्रॉल असते. रक्तात होणाऱ्या कोलेस्ट्रॉलवरीला याचा प्रभाव व्यक्तीनुसार बदलू शकतो.
अंड अचानक सोडल्यावर खायचं तरी काय?
तुम्ही अंड खायचं सोडलं तर प्रोटीन्स मिळण्यासाठी तुम्हाला मांस, मच्छी, बीन्स, डाळ, टोफू आणि नट्स सारख्या पदार्थाचा जेवणात समावेश करावा लागेल. संतुलित आहार ठेवा. पोषक तत्व इतर पदार्थांपासून मिळतील, याची काळजी घ्या. विटामिन डी फोटिफाइड दूध आणि सेल्मनपेक्षा मासे खाऊन जास्त मिळू शकते. विटामिन बी 12 मांस, मच्छी आणि डेयरी उत्पादनांमध्ये आढळते. यासोबतच मांस, चिकन, मासे बीन्समध्ये आयर्न खूप असते.
अंडे पोषक तत्वांसाठी उत्तम सोर्स
अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. यामध्ये फॉस्फरस, विटामिन ए, बी,डी आणि आयर्न असते. यामध्ये तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व जवळजवळ भरुन निघतात.
प्रोटीनने भरपूर
एका मोठ्या अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि हे प्रोटीन उच्च गुणत्तेचे प्रोटीन असते. शरीरासाठी दररोज आवश्यत असणारे अमिनो अॅसिडदेखील असते.
डोळ्यांसाठी उत्तम
अंड्यामध्ये ल्यूटीन आणि जेक्सेन्थिन असते, जे अॅण्टीऑक्सिडेंट आहे. यामुळे मोतिबिंदू आणि मेक्युलर डीजेनरेशनची जोखीम कमी होते. नियमित अंडी खाणे हृदयासाठी फायदेशीर असते. यामध्ये बीटाइन आणि कोलीन असते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.