How much Water Should you Drink According to Age : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी अन्न पदार्थांसह व्यायामचीही आवश्यकता असते. त्यासोबत आपल्याला आपल्या शरीराला पाण्याचीही तेवढीच गरज असते. आपलं शरीर हे 65 – 70 टक्के पाण्याने बनलेले आहे. यामुळे आपल्या शरीराला योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी पाण्याची विशेष आवश्यकता असते. पाणी शरीराच्या सर्व भागांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी संरक्षण प्रदान करते. पाण्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वय, लिंग, शरीराचे वजन आणि हवामानानुसार वेगवेगळी असतात. पण सर्व लोकांसाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असतं. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांनी किती पाणी प्यावे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. (How much water is needed to stay healthy according to age Drinking Water Guidelines in Marathi )
1-3 वर्षे वयोगटातील मुलांनी किती पाणी प्यावे?
आहारतज्ज्ञ शिखा कुमारी यांनी त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलंय की, 1 – 3 वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज 4-5 कप किंवा 800-1000 मिली पाणी प्यावे.
4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांनी किती पाणी प्यावे?
4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज 1200 मिली किंवा 5 कप पाणी प्यावे. यामध्ये द्रव अन्नाचाही समावेश आहे.
9-13 वयोगटातील मुलांनी किती पाणी प्यावे?
9 -13 वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज 7 ते 8 कप किंवा 1600-1900 मिली पाणी प्यावे.
किशोरवयीन मुलाने किती पाणी प्यावे?
14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांनी दररोज 1900 ते 2600 मिली म्हणजेच 8 – 11 कप पाणी प्यावे.
प्रौढ व्यक्तीने किती पाणी प्यावे?
19 ते 64 वयोगटातील लोकांनी दररोज 8 – 11 कप म्हणजे 2000 ते 3000 मिली पाणी प्यावे. पण, पाण्याची गरज व्यक्तीची गरज, त्याचे वजन आणि हवामान यासारख्या घटकांवर देखील अवलंबून असते.
वृद्ध व्यक्तीने किती पाणी प्यावे?
65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांनी दररोज 8 -11 कप किंवा 2000 ते 3000 मिली पाणी प्यावे. वृद्धापकाळात डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो, त्यामुळे वृद्ध व्यक्तीने नेहमी पुरेसे पाणी प्यावे.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)