लठ्ठपणा कमी करण्याचं औषध घेताय? सावधान!; बनावट इंजेक्शनचा बाजार


ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास मुंबई : सामान्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.  कारण लठ्ठपणा आणि डायबिटीजवरील ओझम्पिक इंजेक्शनच्या नावाखाली नकली इंजेक्शन मार्केटमध्ये आलं आहे. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्याचं इंजेक्शन स्वस्तात घेणार असाल तर सावध व्हा.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो.. कुणी व्यायाम करत, कुणी डाएट करतं. मात्र यापेक्षा काहीजण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करत मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं लठ्ठपणा कमी करण्याचं औषधही घेतं. मात्र तुम्ही जर लठ्ठपणा कमी करण्याचं औषध घेण्याचा विचार करत असाल तर सावधान.. कारण लठ्ठपणावरची नकली औषधं बाजारात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. लठ्ठपणा कमी करण्याचं ओझम्पिक इंजेक्शन अनेक पटीनं स्वस्त विकलं जात असेल तर ते नकली असण्याचा धोका आहे. मुंबईत तीन ठिकाणी कारवाई करत एफडीएकडून ओझम्पिक इंजेक्शनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. 

लठ्ठपणा आणि डायबिटीजवर रामबाण उपाय मानल्या जाणा-या ओझम्पिक इंजेक्शनच्या नावाखाली नकली इंजेक्शन बाजारात आल्याचा संशय आहे. ओझम्पिकची इंजेक्शनची स्मगलिंग सुरु झाली आहे. ओझम्पिकचा मोठा साठा महाराष्ट्रात आला आहे. सीरिया आणि आफ्रिकन देशांमधून स्मगलिंग करुन ही इंजेक्शन आणण्यात आली आहे. आणलेल्या इंजेक्शन साठ्यात नकली औषधं असल्याचा संशय आहे. पोलीस आणि एफडीएन या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे मारलेत. शिवाय तीन ठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

 लठ्ठपणा कमी करण्याची औषधं तुम्ही घेणार असाल तर काही काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे लठ्ठपणा आणि डायबेटीजवरील बनावट इंजेक्शम मार्केटमध्ये आल्यानं आपली फसवणूक होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे अशी इंजेक्शन जर तुम्ही घेणार असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.

त्यासोबत लठ्ठपणा कमी करण्याच्या औषधांचं स्मगलिंगही होत असल्याचा मुद्द् समोर आला आहे. परदेशातून ही इंजेक्शन स्मगलिंग करून आणून भारतात विकत असल्याची माहीती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. तर बेकायदेशीरपणे अशी औषधं विकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचंही कमद यांनी सांगितलं आहे. 

लठ्ठपणा कमी करण्याची औषधं तुम्ही घेणार असाल तर काही काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. मार्केटमध्ये लठ्ठपमा कमी करण्याच्या बनावट आणि स्मगलिंगच्या इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आल्यानंतर चिंता वाढली आहे. जर चुकुनही असं बनावट इंजेक्शन घेतलं गेलं तर त्याचे अनेक धोकेही आहेत. 

तुम्हाला जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. मात्र तुम्हा लठ्ठपणा कमी करण्याचं इंजेक्शन जरी घ्यायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य ठिकाणी घ्या. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठीच्या बनावट औषधांपासून राहा सावध.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *