तणावामुळे उद्भवणारे हृदयविकार कसे टाळाल? तज्ज्ञ सांगतात महत्त्वाचे उपाय


तणाव हा मानसिक आरोग्याबरोबर शारीरीक आरोग्यावरही तितकाच दुष्परिणाम करत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे तणावाचे प्रमाण वाढले असून पुर्वी प्रौढांमध्ये आढळणाऱ्या आरोग्य समस्या आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागल्या आहेत. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण हा एक चिंतेचा विषय ठरला असून वेळीच उपचार यावर करण्याची आवश्यकता आहे. अशा समस्या टाळण्यासाठी काय करता येईल याबाबत डॉ. अहमद खान, इंटरनल मेडिसिन, मधुमेह आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ यांनी माहिती दिली आहे. 

हल्ली तरुणांना शिक्षण, नोकरी, सोशल मीडिया, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक अपेक्षांच्या ओझामुळे उच्च पातळीच्या तणावाचा सामना करावा लागतोय. २० ते  ३० वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, रक्तातील साखरेची उच्च पातळी, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांचे निदान होत आहे. तणाव हा एक सायलेंट किलर ठरतो आहे. जरी त्याची लक्षणे लगेच दिसून येत नसली तरी, त्यामुळे एखाद्याला जीवघेण्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो.

तणाव हे कॉर्टिसोलची पातळी वाढवते, जे एक तणाव संप्रेरक आहे व त्याचा समतोल बिघल्यास ते रक्तदाब आणि साखरेची पातळी वाढवू शकतो तसेच पोटाभोवती चरबी साठवण्यास सुरुवात होते ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. जे हृदयरोग आणि मधुमेहासाठी जोखीम घटक ठरत आहेत. दुर्देवाने तरुण वयोगटातील रुग्ण हे त्यांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. तरुणांनी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे ही काळाची गरज आहे.

खालील टिप्स फॉलो करा

झोपेच्या कमतरतेमुळे तणाव वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि लक्ष केंद्रित करण्यास अडचणी येतात. यासाठी एक वेळ निश्चित करुन दररोज त्याच वेळी झोपायला जाण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा, अगदी वीकएंडला सुध्दा त्याच वेळापत्रकाचे पालन करा. रात्री किमान ७ ते ८ तास शांत झोप घेणे आवश्यक आहे.

विविध अभ्यासांनुसार, शारीरिक हालचाली, व्यायाम हे कॉर्टिसोलसारखे तणाव संप्रेरक कमी करण्यास मदत करतात आणि मेंदूतील तणाव कमी करणारे एंडोर्फिन सारखे संप्रेरकाचे प्रमाण वाढवतात. केवळ जिमला जाऊनच व्यायाम करावा असे काही नाही. तर, चालणे, नृत्य करणे, सायकल चालवणे हे व्यायाम प्रकार देखील जिमला जाण्याइतकेच प्रभावी ठरतील.

जंक फुडचे सेवन टाळून आहारात फळे, भाज्या, तृणधान्य आणि कडधान्यांचे सेवन करा. शर्करायुक्त पदार्थ आणि तळलेले पदार्थ ताण हे तुमच्या शरीराकरिता अहितकारक ठरतात. त्यामुळे तुम्हाला योग्य पोषण न मिळाल्यास थकवा जाणवू शकतो. जंक फुड, प्रक्रिया केलेले पदार्ख, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थांचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा.

दिवसातून फक्त १० मिनिटे लांब श्वास घेणे किंवा श्वासोच्छवासाचा व्यायाम करणे हे तुमचे मन शांत करू शकते. योग आणि ध्यान हे आपल्या भावनांचे व्यवस्थापन करण्यास, लक्ष केंद्रित करण्यास आणि शरीराला आराम देण्यास मदत करतात.

तणावमुक्त राहण्यासाठी बऱ्याचदा डिजिटल ब्रेक घेणे गरजेचे आहे. वाढत्या स्क्रिन टाईममुळे एखादी व्यक्ती चिंताग्रस्त होऊ शकते आणि झोपेच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होऊ शकतो. डिजिटल डिटॉक्स हा पर्याय वापरून पहा. झोपण्यापूर्वी स्मार्टफोनचा वापर टाळा, जेणेकरून तुमचा मेंदू शांत राहिल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *