Tea for Cholesterol : ‘हा’ आयुर्वेदिक चहा रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास करेल मदत; असं करा सेवन


Tea for Cholesterol : आपल्या प्रत्येकाच्या शरीरात चांगल आणि खराब कोलेस्ट्रॉल असतं. खराब कोलेस्ट्रॉलच प्रमाण वाढल्यास शरीरातील रक्त वाहिन्यांमध्ये चिकट पिवळा रंगाची घाण जमा होते. यामुळे बीपी वाढणे, हृदयविकाराचा झटका येणे किंवा हार्ट फेल्युअर सारख्या गंभीर समस्या होत्यात. गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटक्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बदललेली जीवनशैली, कामाचा वाढता ताण आणि खाण्या पिण्याचा चुकीच्या पद्धतीमुळे अनेक आजारांना आपणच निमंत्रण देतोय. त्यातील एक गंभीर समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉलची आहे. (Ayurvedic tea will make bad cholesterol disappear from blood vessels health in marathi )

बाहेरचे तेलकट किंवा मसालेदार अन्न सतत खाणे, अपुरी झोप, पौष्टिक आहाराचा अभाव इत्यादींमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराने आपल्या दैनंदिन आहारात अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे जे पचायला सोपे असेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नसांमध्ये जमा झालेले कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी आयुर्वैदात चहा सांगण्यात आलाय. 

लसूण चहा

लसूण हे आरोग्यासाठी खूप पोषक मानलं जातं. लसणातील दाहक-विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. लसणाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. लसणाचा चहा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल जातो.  लसूण चहा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी गरम करा. नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालून उकळवा. नंतर पाणी 5 मिनिटे उकळा. आता गॅस बंद करून चहा गाळून घ्या. नंतर त्यात लिंबाचा रस मिसळून प्या.

जास्वंदीच्या फुलांचा चहा

जास्वंदीच्या फुलाचा वापर मंदिरात पूजा आणि इतर गोष्टींसाठी केला जातो. त्याशिवाय जास्वंदीच्या फुलांचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठीही केला जातो. सकाळी उठल्यानंतर दुधासोबत चहा पिण्याऐवजी चमेलीचा चहा नियमित पिऊ शकता.

हा चहा प्यायल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होण्यास मदत मिळते. ज्यांना ब्लडप्रेशरशी संबंधित समस्या आहेत त्यांनी नियमित चमेलीच्या फुलाचा चहा प्यावा. जास्वंदीचा चहा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी गरम करून त्यात जास्वंदीची फुले टाकून चांगली उकळवा. यानंतर पाणी गाळून त्यात मध मिसळा.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *