बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) अलीकडेच मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गाला लागून असलेल्या सात ठिकाणांची माहिती काढली आहे. ज्यामुळे मुंबईत पूरस्थिती (floods) तयार होते.
सोमवार, 30 सप्टेंबर रोजी रेल्वे अधिकारी आणि महापालिका (bmc) प्रशासन यांच्यात एक बैठक झाली. यात पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी ड्रेनेज लाईन वाढवण्याचा निर्णय घेतला गेला.
25 सप्टेंबर रोजी 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rains) मुंबई ठप्प झाली होती. यानंतर पाच दिवसांनी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे रात्री 8.30 ते 11.30 या वेळेत रुळांवरून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.
प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की यातील बहुतेक ठिकाणे रेल्वे रुळांजवळ आहेत. तसेच या भागात असलेले नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे ट्रॅक बुडाले होते.
पालिका अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, मध्य मार्गावरील या ठिकाणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) येथील रेल्वे यार्डचा समावेश आहे. भांडुप, विद्याविहार, सायन, माटुंगा, विक्रोळी आणि कांजूरमार्ग दरम्यान जोडणारे स्ट्रॉम वॉटर ड्रेनमुळे झाले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
तसेच हार्बर मार्गावरील स्थानकांमध्ये शिवडी-वडाळा आणि कुर्ला-मानखुर्द दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकचा समावेश आहे.
हेही वाचा